Rajasthan Royals vs Gujarat Titans
Rajasthan Royals vs Gujarat Titans ESAKAL
IPL

RR vs GT : गुजरातने राजस्थानचा केला 9 विकेट्स राखून पराभव

अनिरुद्ध संकपाळ

Rajasthan Royals vs Gujarat Titans : गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा तब्बल 9 विकेट्स आणि 37 चेंडू राखून दारूण पराभव केला. गुजरातने राजस्थानचा त्यांच्यात घरात पराभव करत अहमदाबादमधील पराभवाचा बदला घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानला गुजरातने 118 धावात गुंडाळले. त्यानंतर हे आव्हान 13.5 षटकात 1 फलंदाजाच्या मोबदल्यात पार केले. गुजरातकडून वृद्धीमान साहाने सर्वाधिक 41 धावा केल्या तर त्याला शुभमन गिलने 36 तर हार्दिक पांड्याने 15 चेंडूत नाबाद 39 धावा करत चांगली साथ दिली.

गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात राजस्थानचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय फारसा काही फळाला आला नाही. गुजरातने त्यांचा संपूर्ण संघ 118 धावात गारद करत सामन्यावर आपली मजबूत पकड मिळवली आहे. गुजरातकडून फिरकीपटू राशिद खान आणि नूर अहमद यांनी भेदक मारा करत राजस्थानचा निम्मा संघ गारद केला. राजस्थानकडून संजू सॅमसनने सर्वाधिक 30 धावा केल्या.

72-5 (10 Ov) : राशीद खानने राजस्थानची फलंदाजी भेदली. 

राजस्थानचा सलामीवीर बटलर 8 धावा करून बाद झाल्यानंतर दुसरा सलामीवीर यशस्वी जैसवाल देखील 14 धावा करून बाद झाला. दरम्यान, कर्णधार संजू सॅमसनने 30 धावा करत संघाला अर्धशतक पार करून दिले. मात्र जोशुआ लिटीलने त्याची खेळी संपवली.

राजस्थानचे तगडे फलंदाज बाद झाल्यानंतर राशीद खानने अश्विनला 4 तर रियान परागला 2 धावांवर बाद करत राजस्थानची अवस्था 10 षटकात 5 बाद 72 अशी केली.

राजस्थानला पहिला धक्का

गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने राजस्थान रॉयल्सला पहिला धक्का दिला. त्याने सलामीवीर जॉस बटलरला 8 धावांवर बाद केले.

राजस्थानने नाणेफेक जिंकली

राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. अजित पवार, उदयनराजे भोसले यांनी केलं मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Sakal Podcast : मावळ लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? ते सुनीता विल्यम्सची पुन्हा अवकाश भरारी

SCROLL FOR NEXT