Rajasthan Royals | IPL 2024 Sakal
IPL

IPL 2024: आठ विजय, एक पराभव अन् 16 पाँइंट्स; तरी राजस्थान रॉयल्स अजूनही प्लेऑफसाठी पात्र नाही, जाणून घ्या कारण

Rajasthan Royals: आठ विजय मिळवूनही राजस्थान रॉयल्सही होऊ शकतात प्लेऑफमधून बाहेर? कसं घ्या जाणून

Pranali Kodre

Rajasthan Royals: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने शनिवारी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध 7 विकेट्सने विजय मिळवला.

हा राजस्थानचा यंदाच्या हंगामातील 9 सामन्यांतील 8वा विजय ठरला आहे. त्यांनी आत्तापर्यंत केवळ एक पराभव पाहिला आहे. त्यामुळे राजस्थानचे सध्या 16 गुण झाले आहेत. यासह पाँइंट्स टेबलमध्ये राजस्थान अव्वल क्रमांकावर आहेत.

राजस्थानसाठी या कामगिरीमुळे प्लेऑफचा मार्ग सोपा असला, तरी अद्याप ते प्लेऑफसाठी पात्र ठरलेले नाहीत. खरंतर 16 गुणांसह बऱ्याचदा संघ प्लेऑफला पात्र ठरल्याचे दिसून येते. मात्र असे असतानाही अद्याप राजस्थान रॉयल्स अधिकृतरित्या प्लेऑफसाठी पात्र का ठरले नाहीत, असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

त्यामागील कारण म्हणजे अद्याप रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू व्यतिरिक्त अन्य 8 संघही 16 गुणांपर्यंत पोहचू शकतात.

त्यामुळे एकूण गणितीय समीकरणानुसार जर राजस्थान रॉयल्स त्यांचे उर्वरित पाचही सामने पराभूत झाले आणि अन्य 8 संघांपैकी 4 संघांची त्यांच्यापेक्षा अधिक गुण मिळवले, तर राजस्थान अद्यापही प्लेऑफमधून बाहेर होऊ शकतात.

सध्या गुणतालिकेत आठव्या आणि नवव्या क्रमांकावर असलेल्या पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स संघाचेही 5 सामने बाकी असल्याने ते जास्तीत जास्त 16 गुणांपर्यंत पोहचू शकतात. हे दोन संघ अजून एक जरी सामना हरले, तरी त्यांना राजस्थानच्या 16 गुणांपर्यंत पोहोचता येणार नाही.

तसेच दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स हे दोन संघ त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकले तरी जास्तीत जास्त 18 गुणांपर्यंत पोहचू शकतात, त्याचमुळे त्यांनी जर आणखी दोन पराभव पत्करले, तर मात्र राजस्थानचा मार्ग आणखी सोपा होईल.

याशिवाय लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघांना जास्तीत जास्त 20 गुणांपर्यंत पोहचला येणार आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघाला जास्तीत जास्त 22 गुण मिळवता येणार आहेत.

त्यामुळे एकूण विचार करता अद्यापतरी राजस्थानला अधिकृतरित्या प्लेऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी आणखी एक किंवा दोन विजयांची तरी गरज असणार आहे. (Rajasthan Royals Playoffs Scenario)

राजस्थान रॉयल्सचे उर्वरित साखळी सामने -

  • 2 मे - विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, हैदराबाद

  • 7 मे - विरुद्ध दिल्ली कॅपिट्लस, दिल्ली

  • 12 मे - विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, चेन्नई

  • 15 मे - विरुद्ध पंजाब किंग्स, गुवाहाटी

  • 19 मे - विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, गुवाहाटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेटप्रेमींसाठी ६ डिसेंबर आहे खास...आज एक दोन नव्हे तर तब्बल ११ क्रिकेटपटूंचा वाढदिवस 'Birthday Special-11' एकदा वाचाच...

DK शिवकुमार-जारकीहोळी भेटीमागचे राजकारण गडद; सत्तावाटपावरून काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली, संक्रातीपर्यंत निर्णय होणार?

Panchang 6 December 2025: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

Kolhapur Accident : कोल्हापुरात भीषण अपघातात दोन ठार; मुलाच्या शिक्षणासाठी चौकशी करण्यास गेलेल्या बापाचा मृत्यू जिवाला चटका लावणारा...

Ajit Pawar: शेरवानी, फेटा अन् गॉगल… लूक बदलला, ताल जुळला! लेकाच्या लग्नात अजित पवारांचा ‘झिंगाट’ डान्स व्हायरल, दादांचा लूक तर पाहा

SCROLL FOR NEXT