Rajasthan Royals will face Chennai Super Kings in today's IPL match  
IPL

IPL 2023 : धोनीच्या चेन्नईचा झंझावात संजूची राजस्थान रोखणार?

चेन्नई सुपरकिंग्सने मागील तीन लढतींमध्ये विजय मिळवून प्ले ऑफच्या दिशेने वाटचाल केली आहे.....

सकाळ ऑनलाईन टीम

IPL 2023 : चेन्नई सुपरकिंग्सने मागील तीन लढतींमध्ये विजय मिळवून प्ले ऑफच्या दिशेने वाटचाल केली आहे. चेन्नई सुपरकिंग्ससमोर आज होणाऱ्या आयपीएल लढतीत राजस्थान रॉयल्सचे आव्हान असणार आहे. राजस्थान रॉयल्सला मागील दोन लढतींत पराभवाचा सामना करावा लागला आहे. घरच्या मैदानावर होणाऱ्या लढतीत विजयी पुनरागमन करण्यासाठी ते प्रयत्नशील असतील.

संजू सॅमसन नेतृत्व करीत असलेला राजस्थान रॉयल्सचा संघ सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर (मंगळवार रात्रीपर्यंतच्या लढतीपर्यंत) आहे. अव्वल स्थानावर असलेल्या चेन्नई सुपरकिंग्सवर वर्चस्व गाजवणे त्यांच्यासाठी सोपे नसणार आहे.

डेव्होन कॉनवे (३१४ धावा), ॠतुराज गायकवाड (२७० धावा), अजिंक्य रहाणे (२०९ धावा) व शिवम दुबे (१८४ धावा) या चार फलंदाजांनी आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.चेन्नईच्या गोलंदाजी विभागात अनुभवाची कमतरता आहे. रवींद्र जडेजा व मोईन अली वगळता इतर गोलंदाजांकडे अनुभव नाही. गोलंदाजी प्रशिक्षक ड्वेन ब्राव्हो यांच्या मार्गदर्शनात तुषार देशपांडे व आकाश सिंग यांचा खेळ बहरत आहे.

राजस्थानच्या संघाने पहिल्या पाचपैकी चार लढतींमध्ये विजय मिळवून आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. पण त्यानंतर सलग दोन लढतींमध्ये त्यांना हार पत्करावी लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Black Magic Ritual: महाराष्ट्र हादरला! सोळा वर्षीय मुलीवर अघोरीकृत्य, वर्षभरापासून सुरू होता प्रकार! शेवपेटीत झोपवायचा अन्...

Latest Maharashtra News Updates : पंचगंगेच्या पाणीपातळीत अर्ध्या फुटाने घट; कोल्हापुरात अद्यापही ४८ बंधारे पाण्याखाली

Vidarbha Rain: विठ्ठल पावला... विदर्भात पावसाची संततधार; यवतमाळात नदी नाल्यांना पूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, सर्वत्र पावसाचा संचा

Hinjawadi IT Park : हिंजवडीमधील समस्यांचा मुख्यमंत्री घेणार आढावा; आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

Basmat Crime: विदर्भातील तरुणीवर प्रेमाच्या नावाखाली अत्याचार; वसमतमधील आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT