MS Dhoni - Ruturaj Gaikwad | Ravi Shastri Sakal
IPL

MS Dhoni: ऋतुराजला धोनीने का दिली CSK संघाची कॅप्टन्सी, रवी शास्त्री म्हणाले, 'त्याचा अखेरचा हंगाम...'

Ravi Shastri on CSK Captaincy: धोनीने चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व ऋतुराज गायकवाडकडे का सोपवले असावे, याबाबत रवी शास्त्रींनी प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

Ravi Shastri on CSK Captaincy: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने नवा कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चांगली सुरुवात केली आहे. चेन्नईने आत्तापर्यंत 3 सामने खेळले असून पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे, तर एका सामन्यात पराभव स्विकारला आहे.

दरम्यान, आयपीएलच्या या 17 व्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीच चेन्नई संघात नेतृत्वबदल पाहायला मिळाला. खरंतर चेन्नईने आयपीएलमध्ये यापूर्वी खेळलेल्या सर्व हंगामात एमएस धोनीने नेतृत्व केले आहे.

केवळ 2022 सालच्या हंगामापूर्वी त्याने रविंद्र जडेजाकडे नेतृत्वाची धुरा सोपवली होती, परंतु संघाच्या खराब कामगिरीनंतर जडेजाने पहिल्या 8 सामन्यांनंतर कर्णधारपद सोडले. त्यानंतर पुन्हा एकदा धोनीनेच ती जबाबदारी खांद्यावर घेतली होती.

यानंतर आता धोनीने 2024 आयपीएलपूर्वी कर्णधारपदावरून पायउतार होत चेन्नईच्या नेतृत्वाची जबाबदारी 26 वर्षीय ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर सोपवली. त्यामुळे यंदा चेन्नई ऋतुराजच्या नेतृत्वात खेळताना दिसत आहे.

दरम्यान, धोनीने हा निर्णय का घेतला असावा याबाबत भारताचे माजी क्रिकेटपटू व प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मत मांडले आहे. त्यांच्यामते हा धोनीचा अखेरचा हंगाम आहे.

शास्त्री स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाले, 'यंदा धोनीचा अखेरचा हंगाम आहे, हे खूप स्पष्ट आहे. त्याचे शरीर त्याला कसे साथ देत आहे, तो पूर्ण हंगाम खेळणार की नाही, हे फक्त वेळच सांगेल.'

याशिवाय शास्त्री यांनी असेही म्हटले की धोनी ऋतुराजला त्याच्या नेतृत्वासाठी स्वातंत्र देत आहे, तो फक्त तेव्हाच मध्यस्थी करत आहे, जेव्हा गरज असेल.

शास्त्री म्हणाले, 'तो (धोनी) म्हणाला की त्याला स्पर्धेच्या मध्येच ऋतुराजला नेतृत्व द्यायचे नव्हते. मी त्याला दुरून पाहिल, जर त्याला काही गरज लागली, तर मी त्याला मदत करेल.'

'मला (शास्त्रींना) वाटते, ज्यावर्षी जडेजा कर्णधार झाला होता, त्याच्या तुलनेत धोनी यावेळी आणखी मागे राहिल आणि फक्त ड्रिंक्स ब्रेक किंवा एखादवेळेस ऋतुराजला मदत करताना दिसेल.'

42 वर्षीय धोनी गेली 17 हंगाम आयपीएल खेळत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईने 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. गेल्या हंगामाच चेन्नईने धोनीच्याच नेतृत्वाखाली पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले होते.

त्याने आयपीएलमध्ये 250 हून अधिक सामने खेळले असून 226 सामन्यांत नेतृत्व केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : सायकल ट्रॅक निघाले पण झाडं रस्त्यातच; वाहतुकीला अडथळा, अपघाताची शक्यता

Nashik News : नाशिकमध्ये 'विरासत'चा जागर! अक्षय कुमारची रिक्षामधून ग्रँड एन्ट्री, एमईटी उत्सव जल्लोषात

Mohol News: मोहोळ येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकरणी बारा संशयीत निष्पन्न करण्यात मोहोळ पोलीसांना यश

खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणी नागरीक ढसाढसा रडले, तेहरानमध्ये लोटला जनसागर; भारतात काश्मीरमध्येही रस्त्यावर उतरले लोक

धर्मेंद्र यांच्या अफेअरच्या चर्चेवर सनी-बॉबी देओल यांना वाटलेली लाज, हीमॅन सगळ्यासमोर म्हणालेले, 'माझ्या मागे रोज...'

SCROLL FOR NEXT