Ravi Shastri Says IPL 2022 May Decide Rohit Sharma Successor  ESAKAL
IPL

यंदाची IPL ठरवणार रोहितचा वारसदार : शास्त्री

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली: आयपीएलच्या 15 वा हंगामाकडे (IPL 2022) प्रत्येक जण वेगवेगळ्या नजरेने पाहतो. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि राहुल द्रविड हे टी 20 वर्ल्डकपसाठी संघ तयार करण्याच्या दृष्टीने याकडे पाहतील तर काही वरिष्ठ आणि युवा खेळाडू टीम इंडियात जागा मिळवण्यासाठी आयपीएलकडे एक संधी म्हणून पाहतील. मात्र भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यंदाच्या हंगामाकडे वेगळ्याच नजरेतून पाहत आहेत. त्यांच्या मते हा हंगाम हा भारताचा कर्णधार (Captain) रोहित शर्माचा उत्तराधिकारी (Successor) देखील ठरवेल.

मुलाखती दरम्यान भारताच्या भविष्यातील कर्णधाराबद्दल बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, 'विराट कोहली आता कर्णधार नाहीये. रोहित शर्माने आतापर्यंत चांगले नेतृत्व केले आहे. विशेषकरून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याने चांगले नेतृत्वगुण दाखवले आहेत. पण, भारताला आता भविष्यातील कर्णधार देखील शोधावा लागणार आहे. सध्या भारतीय क्रिकेट वर्तुळात श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि केएल राहुल (KL Rahul) या पदासाठी दावेदारी सांगत आहेत. हे सर्व जण यंदाच्या आयपीएल हंगामात त्यांच्या त्यांच्या संघांचे नेतृत्व करणार आहेत. भारत भविष्यात एका तगड्या कर्णधाराच्या शोधात असेल आणि आयपीएल हे या कर्णधार पदावर दावा सांगणाऱ्यांसाठी एक महत्वाचे व्यासपीठ असणार आहे.'

रवी शास्त्री यांनी ही आयपीएल हार्दिक पांड्यासाठी (Hardik Pandya) देखील महत्वाची असल्याचे सांगितले. तो गोलंदाज, फलंदाज आणि कर्णधार म्हणूनही कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. याचबरोबर लिलावात अनसोल्ड राहिलेला सुरेश रैना (Suresh Raina) आता समालोचक म्हणून आपली नवी इनिंग खेळत आहे. सुरेश रैनाने देखील तो यंदाच्या आयपीएलमध्ये इशान किशन, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरवर नजर ठेवून असणार आहे. चेन्नई सुपर किंग्जमधील मोईन अली आणि रविंद्र जडेजा यांच्यावरही रैनाचे लक्ष असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Rains : पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर; दार्जिलिंगमधील भूस्खलनात आतापर्यत १८ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Latest Marathi News Live Update: माढा तालुक्यातील पूरग्रस्त १८ गावांना विविध समाजसेवी संस्थांकडून मदतीचा ओघ

INDW vs PAKW: पाकिस्तानी कर्णधाराने चालू सामन्यात स्प्रे मारला, नंतर सर्वच खेळाडूंना मैदानाबाहेर काढलं; नेमकं काय घडलं?

Metro-3: अखेर प्रतिक्षा संपली! मेट्रो-३ चा वरळी-कफ परेड टप्पा ९ ऑक्टोंबरपासून प्रवासी सेवेत, जाणून घ्या तिकीट दर

Kojagiri Horoscope Prediction : उद्या कोजागिरी पौर्णिमेला बनतोय गजकेसरी आणि ध्रुव योग; या पाच राशींवर होणार धनलक्ष्मीची कृपा

SCROLL FOR NEXT