Ravindra Jadeja esakal
IPL

CSK vs SRH : रविंद्र जडेजाने हैदराबादला नाचवले आपल्या तालावर; चेन्नईसमोर विजयासाठी माफक आव्हान

अनिरुद्ध संकपाळ

CSK vs SRH : सनराईजर्स हैदराबादने 20 षटकात 7 बाद 134 धावाच करत चेन्नईसमोर विजयासाठी 135 धावांचे माफक आव्हान ठेवले आहे. चेन्नईकडून रविंद्र जडेजाने भेदक मारा करत 4 षटकात 22 धावा देत 3 बळी घेतले. हैदराबादकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक 34 धावा केल्या.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनराईजर्स हैदराबादने पॉवर प्लेमध्ये चांगली सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र आकाश सिंहने हॅरी ब्रुकला 18 धावांवर बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर राहुल त्रिपाठी आणि अभिषेक शर्मा यांनी हैदराबादला 10 षटकात 71 धावांपर्यंत पोहचवले. मात्र रविंद्र जडेजाने अभिषेक शर्माला 34 धावांवर बाद करत हैदराबादला दुसरा धक्का दिला.

रविंद्र जडेजाने अभिषेक शर्माला बाद केल्यातनंतर 21 धावा करणाऱ्या राहुल त्रिपाठी आणि मयांक अग्रवाल यांना देखील बाद करत हैदराबादची अवस्था 5 बाद 97 धावा अशी केली. यानंतर क्लासेन आणि मार्को जेनसेन यांनी प्रत्येकी 17 धावांची खेळी करत हैदराबादला 134 धावांपर्यंत पोहचवले.

सीएसकेकडून रविंद्र जडेजाने 3 तर महीष तिक्षाणा, मथिशा पथिराना आणि आकाश सिंह यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

(Sports Latest News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani GNM Paper Leak : परभणीत नर्सिंगचा पेपर फुटला, सुपरवायझरने बहिणाला WhatsApp वर प्रश्नपत्रिका पाठवली अन्... चौघांना अटक

IND vs SL: यशस्वी जैस्वालचा श्रीलंकन गोलंदाजाशी वाद; हेल्मेटचा संपर्क, आता कारवाई होणार का? ICC चा नियम काय सांगतो?

Mumbai: मुंबईत गणरायाच्या आगमनात संतापजनक प्रकार! मिरवणुकीत इमारतीवरून अंडी फेकल्याचा आरोप; माझगावमध्ये तणावाचे वातावरण

Pune Bus Accident : पुण्यात बसखाली चिरडून कॉलेज विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू, माणिकबाग परिसरात हळहळ

Marathi News Live Updates : वैजापुरात कचोरीत उंदराची विष्ठा आढळल्याने खळबळ

SCROLL FOR NEXT