Ravindra Jadeja - MS Dhoni Viral Video | CSK vs KKR | IPL 2024 
IPL

Ravindra Jadeja: जड्डूचा यु-टर्न अन् थालाची धमाकेदार एंट्री! प्रेक्षकांसह CSK च्या डगआऊटमध्येही हास्याचा फवारा, Video Viral

Ravindra Jadeja - MS Dhoni Viral Video: कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध धोनी फलंदाजीला उतरण्यापूर्वी रविंद्र जडेजा प्रेक्षकांची थट्टा करताना दिसला.

Pranali Kodre

Ravindra Jadeja - MS Dhoni Viral Video: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत सोमवारी (8 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला. एमए चिदंबरम (चेपॉक) स्टेडियम झालेला सामना चेन्नई सुपर किंग्सने 7 विकेट्सने जिंकला.

दरम्यान, या सामन्यातही प्रेक्षकांना चेन्नईचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या फलंदाजीची छोटी झलकही पाहायला मिळाली. पण त्याआधी रविंद्र जडेजा प्रेक्षकांची थट्टा उडवताना दिसला, त्याचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे.

झाले असे की कोलकाताने दिलेल्या 138 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला 3 धावांची गरज असताना धोनी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. खरंतर यापूर्वी धोनी 7 व्या किंवा 8व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला आहे. मात्र, या सामन्यात तो पाचव्याच क्रमांकावर फलंदाजीला उतरला.

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसले की जेव्हा चेन्नईने शिवम दुबेच्या रुपात तिसरी विकेट गमावली. तेव्हा धोनी फलंदाजीला येणार होता, पण तो मैदानात येण्याआधी जडेजाने प्रेक्षकांबरोबर थोडी मस्ती केली.

तो धोनीआधी पायऱ्यांवरून खाली उतरून आली आणि मैदानात जात असल्यासारखे दाखवले, काही पावले पुढे जात तो लगेचच यु-टर्न घेत मागे वळाला आणि हसायला लागला. त्याला असे करताना पाहून चेन्नईच्या डगआऊटमध्येही हशा पिकला.

जडेजाने यु-टर्न घेतल्यानंतर धोनी पायऱ्यांवरून खाली उतरला आणि मैदानात गेला. त्यावेळी प्रेक्षाकांनी मोठ्याप्रमाणात जल्लोष केला. हा व्हिडिओ सध्या वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर कोलकाता नाईट रायडर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 137 धावा केल्या होत्या. कोलकाताकडून कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक 34 धावा केल्या, तर चेन्नईकडून गोलंदाजीत रविंद्र जडेजा आणि तुशार देशपांडे यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 138 धावांच्या आव्हानाचा पाठलाग चेन्नईने 17.1 षटकात 3 विकेट्स गमावत 141 धावा करून पूर्ण केला. चेन्नईकडून कर्णधार ऋतुराज गायकवाड 58 चेंडूत 67 धावा करून नाबाद राहिला. तसेच न्नईकडून शिवम दुबेने 28, डॅरिल मिचेलने 25 आणि रचिन रविंद्रने 15 धावांची खेळी केली, तर एमएस धोनी 1 धावेवर नाबाद राहिला.

कोलकाताकडून गोलंदाजीत वैभव अरोराने 2 विकेट्स घेतल्या, तर सुनील नारायणने 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT