IPL 2023 Faf Du Plessis 
IPL

IPL 2023 : 'शेवटच्या चेंडूवर धावबाद होण्याची अपेक्षा होती दुर्दैवाने...' पराभवानंतर कर्णधाराने खेळाडूंना फटकारले

BP वाढवणारा सामना... झाला एक नंबर!

Kiran Mahanavar

IPL 2023 Faf Du Plessis : इंडियन प्रीमियर लीग 2023चा 15वा सामना 10 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अनेक चढउतार पाहिला मिळाले. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना कोण जिंकणार हे ठरले नव्हते. पण शेवटी लखनौचा संघ जिंकला.

आरसीबीने प्रथम खेळताना 2 बाद 212 धावा केल्या. लखनौने विजयासाठी दिलेले 213 धावांचे लक्ष्य शेवटच्या चेंडूवर 9 गडी गमावून पूर्ण केले. लखनौविरुद्धच्या पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिस खूपच निराश दिसला. सामना संपल्यानंतर तो म्हणाला की, जिंकण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.

लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या अनपेक्षित पराभवानंतर आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे नाराजी दिसत होती. तो सामना संपल्यानंतर म्हणाला, 'मी पराभवाने निराश झालो आहे. साहजिकच मधल्या षटकांमध्ये ते चांगलं खेळले. पण मला वाटले की आम्ही शानदार पुनरागमन केले. मला शेवटच्या चेंडूवर धावबाद होण्याची अपेक्षा होती. सुरुवातीला 7 ते 14 षटकांपर्यंत धावसंख्या संथ होती. पण शेवटच्या पाच षटकांमध्ये चेंडू बॅटवर चांगला येत होता, जो दुसऱ्या डावातही कायम राहिला.

फाफ डु प्लेसिस पुढे म्हणाला, 'मी माझी सर्व शस्त्रे आजमावली. दुर्दैवाने त्याने आमच्या मुख्य गोलंदाजाला खूप मारले. हर्षल पटेलचे पहिले 2 षटके महागडे होते. मात्र नंतर तो परतला. डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करणे कठीण आहे. जिंकण्यासाठी तुम्हाला तुमचे सर्वोत्तम देणे आवश्यक आहे.

आयपीएल 2023 मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हा सलग दुसरा पराभव आहे. 2 एप्रिलला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या जोरदार विजयानंतर आरसीबी दुसऱ्या विजयाच्या शोधात आहे. सहा एप्रिलला बंगळुरूला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 81 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता आणि काल लखनौने त्याचा 1 गडी राखून पराभव केला. सलग 2 पराभवानंतर आरसीबीचा संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर घसरला आहे. इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये बेंगळुरूचे 3 सामन्यांतून 2 गुण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीदरम्यान निवडणूक आयोगात मोठे फेरबदल; मतदारयादी विभागातील अधिकाऱ्यांची बदली

वयाच्या २६ व्या वर्षी ७५ लाखांची संपत्ती! १८ हजारांच्या पगारापासून सुरू झाला प्रवास

वयाच्या ६० व्या वर्षीही मिलिंद सोमण अनवाणी धावतात! पायांच्या स्नायूंना होतात 'हे' फायदे; पण ही काळजी घ्या

सायन रुग्णालयात डॉक्टरने जीवन संपवलं; स्वत:लाच सलाईन लावत ॲनस्थेशियाचा ओव्हरडोस घेतला, बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News : सीजेपी आंदोलकांची पुण्यात धरपकड

SCROLL FOR NEXT