Virat-RCB-Record 
IPL

IPL 2021: कोहलीचा 'विराट' विक्रम; धोनी, रोहितला 'हे' जमलं नाही

विराज भागवत

विराटने मैदानात पाऊल ठेवताच झाला धडाकेबाज विक्रम

IPL 2021: स्पर्धेचा दुसरा टप्पा रविवारपासून दुबईत सुरू झाला. पहिल्या सामन्यात चेन्नईने मुंबईला २० धावांनी पराभूत केले. त्यानंतर सोमवारी विराट कोहलीचा बंगळुरू संघ कोलकाताविरूद्ध मैदानात उभा ठाकला. विराटने मैदानात पाऊल ठेवताच एक मोठा विक्रम केला. महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, रोहित शर्मा ही IPL मधील बडी नावं आहेत. या खेळाडूंनाही जे शक्य झालं नाही, तो महाविक्रम विराटने सोमवारच्या सामन्यात केला.

विराट कोहली कोलकाताविरूद्ध जेव्हा मैदानात उतरला, त्यावेळी त्याने २०० IPL सामने पूर्ण केले. २०० सामने खेळणाऱ्यांमध्ये धोनी, रैना आणि रोहितचेदेखील नाव आहे. पण विराटने जो विक्रम केला, तो इतर कोणालाही जमलेला नाही. विराटने सर्व २०० सामने हे बंगळुरू संघाकडूनच खेळले. एकाच संघाकडून २०० सामने खेळणारा विराट हा पहिलाच खेळाडू ठरला. बाकीच्या खेळाडूंनी विविध संघातून खेळताना एकूण २०० सामन्यांचा टप्पा गाठला. पण विराटने २००८ला बंगळुरूचा हात धरला तो अद्यापही सोडलेला नाही.

यंदाच्या स्पर्धेनंतर विराट सोडणार RCB चे कर्णधारपद

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने काही दिवसांपूर्वीच भारताच्या टी२० संघाचा राजीनामा दिला. T20 World Cup नंतर विराट भारताच्या टी२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर रविवारी विराटने आणखी एक मोठी घोषणा केली. IPL 2021 हे पर्व संपल्यानंतर विराट कोहली RCB म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कर्णधार पदावरूनही दूर होणार असल्याचे विराटने स्पष्ट केले. विराटचा हा व्हिडीओ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या ट्वीटर हँडलवर पोस्ट केला आणि माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI News: बनावट विमा आणि एनपीएस विकणे महागात पडणार! रिझर्व्ह बँकेकडून कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी; कारवाई काय होणार?

Tukaram Mundhe: बोगस दिव्यांगांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये; कारवाई होणार?

World Record : भारताने मोडला रिकी पाँटिंगच्या ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड रेकॉर्ड! जगात अशी अविश्वसनीय कामगिरी करणारी पहिली टीम

Viral Video: धावत्या ट्रेनमधील स्टंटवर नेटकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले धाडस की..! पाहा व्हायरल व्हिडिओ

IND vs PAK: भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या विजयाचं 'धुरंधर' स्टाईल सेलिब्रेशन अफगाणिस्तान अन् बलुचिस्तानमध्ये? Video होतायेत Viral

SCROLL FOR NEXT