RR vs RCB IPL 2024 Eliminator updates SAKAL
IPL

RR vs RCB : सामना न खेळता RCB आयपीएलमधून जाणार बाहेर? BCCIच्या 'या' नियमामुळे चाहते टेन्शनमध्ये

RR vs RCB IPL 2024 Eliminator updates : आयपीएल 2024 चा एलिमिनेटर सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाणार आहे.

Kiran Mahanavar

RR vs RCB IPL 2024 Eliminator updates : आयपीएल 2024 चा एलिमिनेटर सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाणार आहे. पॉइंट टेबलमध्ये राजस्थानचा संघ तिसऱ्या तर आरसीबीचा संघ चौथ्या क्रमांकावर होता.

जो संघ एलिमिनेटर सामना हरेल तो आयपीएल 2024 मधून बाहेर जाईल. मात्र, आरसीबीचा संघ सामना न खेळताच बाहेर होऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. बीसीसीआयच्या या नियमामुळे आरसीबी चाहत्यांचे टेन्शन वाढले आहे.

आरसीबी आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात जर पाऊस पडला तर बंगळुरूच्या चाहत्यांची चिंता वाढू शकते. याचे कारण प्लेऑफ सामन्यांसाठी राखीव दिवस नाही. आणि जर पावसामुळे सामना रद्द झाला नाही तर गुणतालिकेत वरचा संघ पुढे जाईल.

नियमानुसार, पावसामुळे सामना उशीर झाला, तर पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त 2 तास दिले जातील. प्लेऑफ सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस नाही. जर पाऊस पडला तर पंच किमान 5 षटकांचा सामना आयोजित करण्याचा प्रयत्न करतील. जर 5 षटकांचा सामना देखील होऊ शकला नाही तर सुपर ओव्हर होईल आणि जर सततच्या पावसामुळे सुपर ओव्हर देखील होऊ शकली नाही तर सामना रद्द घोषित केला जाईल. अशा परिस्थितीत जो संघ गुणतालिकेत वरचा असेल तोच पुढे जाईल.

उदाहरणार्थ, जर आरसीबी आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना पावसामुळे वाहून गेला, तर राजस्थान रॉयल्स संघ पुढे जाईल आणि आरसीबी बाहेर जाईल, कारण ते पॉइंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या खाली आहेत. अशा परिस्थितीत आरसीबी एकही सामना न खेळता आयपीएलमधून बाहेर पडू शकते आणि हा संघासाठी मोठा धक्का असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT