RCB vs CSK shivam dube hit 111 meter six vs rcb watch video longest six in ipl 2023  
IPL

RCB vs CSK Video : आरसीबीची दाणादाण! शिवम दुबेच्या सिक्सरकडं बघतचं राहीले प्रेक्षक

रोहित कणसे

रॉयल चॅलेंजर्स बगळुरू म्हणजेच आरसीबी आणि चेन्नई सुपर किंग्स म्हणजे सीएसके यांच्यात आयपीएल २०२३ मधील २४ वा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. यासामन्यादरम्यान सीएसकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना शिवम दुबेने आयपीएल २०२३ मधील दुसरा सर्वात लांब छक्का मारला आहे.

हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर दुबेने तब्बल १११ मीटल लांबीचा षटकार लगावला. याआधी त्याने १०१ मीटर लांब सिक्स लगावला होता. यापूर्वी आयपीएल २०२३ मधील सर्वात दूरवर मारलेला सिक्स फाफ डु प्लेसिसने ११५ मिटर मारला आहे.

शिवम दुबेने मारलेला हा सिक्स सीएसकेच्या फलंदाजी दरम्यान १३ व्या ओव्हरमध्ये हर्षल पटेलच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये लगावला. यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नात हर्षल पटेलने दुबेला फुलटॉस बॉल टाकला. या बॉलवर डावखुरा फलंदाज असलेल्या दुबेने १११ मिटर लांबीचा सिक्स लगावला. हा शॉट पाहून आरसीबीच्या खेळाडूंसह कंमेंटेटर्स देखील हैराण होते.

मॅचमध्ये काय झालं?

या सामन्यात आरसीबीने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. फाफ डु प्लेसिसचा हा निर्णय संघासाठी म्हणावा तसा फायदेशीर ठरला नाही. सीएसकेने त्यांच्या डावात आरसीबीसमोर धावांचा डोंगर उभा केला. सीएसकेने २० षटकात सह गडी गमावून २२६ धावांचा डोंगर उभा केला. याचा पाठलाग करताना बातमी लिहीपर्यंत आरसीबीने चार ओव्हरमध्ये दोन विकट्स गमावून ४५ धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

Accident News: देव तारी त्याला...! पाच मजली इमारत कोसळूनही तीन महिन्यांची चिमकुली सुखरुप बचावली, 27 जणांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपाचा धंदा - उद्धव ठाकरे

Mutual Fund: 3,000 रुपयांची SIP की 3 लाख रुपयांची Lumpsum: 30 वर्षांनंतर कोण देणार जास्त परतावा?

Nagpur Crime: नागपूर हादरलं! प्रियकराच्‍या मदतीने पतीचा खून; उत्तरीय चाचणीच्या अहवालातून खुलासा

SCROLL FOR NEXT