Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals 
IPL

IPL 2023 : पंतचा अपघात अन् दिल्ली संघाची सर्व गणिते बिघडली, पहिल्या विजयाची आस

दिल्ली कॅपीटलला यंदाच्या आयपीएलमध्ये चार सामन्यानंतर एकही विजय मिळवता आलेला नाही अन्...

सकाळ ऑनलाईन टीम

Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals : सौरव गांगुली आणि रिकी पाँटिंग वेगवेगळ्या नात्याने सपोर्ट स्टाफमध्ये असले तरी दिल्ली कॅपीटल संघाला यंदाच्या आयपीएलमध्ये चार सामन्यानंतर एकही विजय मिळवता आलेला नाही. आज त्यांचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाबरोबर होत आहे.

गाडी अपघातामुळे रिषभ पंतला झालेली गंभीर दुखापत त्यानंतर दिल्ली संघाची सर्व गणिते बिघडली आहेत. हुकमी खेळाडू आणि कर्णधाराशिवाय त्यांना खेळावे लागत आहे. अनुभवी डेव्हिड वॉर्नर नेतृत्वाची धुरा सांभाळत असला तरी कधी काळी अंतिम फेरीपर्यंत पोहचलेल्या दिल्लीला यंदा एकही विजय हाती लागलेला नाही.

दिल्ली संघात तसे नावाजलेले फलंदाज आहेत, परंतु वॉर्नर आणि त्याचा उपकर्णधार अक्षर पटेल यांचा अपवाद वगळता इतर सर्व फलंदाज निराशा करत आहेत त्याच मिशेल मार्श लग्नासाठी मायदेशी परतल्यामुळे त्यांची फलंदाजी अधिकच कमकूवत झाली आहे. तो आता संघात परतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्या सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये वॉर्नर दुसऱ्या क्रमांकावर आहे, परंतु त्याचा ११४.८३ हा स्ट्राईक रेट चिंता करणारा आहे. वेगात धावा करण्यास तो अपयशी ठरत आहे, कदाचीत दुसऱ्या बाजूने साथ मिळत नसल्यामुळे डाव सावरण्यावर वॉर्नरचा भर असल्याचे सांगण्यात येत आहे.

वॉर्नरचा सलामीचा साथीदार आणि आयपीएलच्या अनेक सामन्यांमध्ये तुफानी टोलेबाजी करणाऱ्या पृथ्वी शॉचे यंदाचे अपयश संघाची लय बिघडवत आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर पृथ्वी शॉ, मनिष पांडे, यश धुल यांनी मोठे योगदान देणे अतिशय महत्वाचे आहे. परदेशी खेळाडूंमध्ये रोवमन पॉवेलनेही निराशा केली आहे उद्या त्याच्याऐवजी फिल साल्टला संधी मिळू शकते.

दिल्लीची गोलंदाजी एन्रिक नॉर्किया आणि मुस्तफिझुर रहमान यांच्यावर आधारलेली आहे. कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांची त्यांना साथ असेल, परंतु नॉर्कियाचा अपवाद वगळता इतरांनी तेवढी प्रभावी कामगिरी केलेली नाही.

दुसऱ्या बाजुला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा संघ आपली गाडी रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. सलामीच्या सामन्यात मुंबईला सहज पराभूत केल्यानंतर पुढच्या दोन सामन्यांत त्यांनाही पराभवाची चव चाखावी लागली आहे. असे असले तरी सलामीला खेळणारा विराट कोहली चांगल्याच फॉर्मात आहे. कर्णधार डुप्लेसीही चांगली साथ देत आहेत, मॅक्सवेलला मात्र सातत्य दाखवावे लागणार आहे. तर कार्तिकला फलंदाजीबरोबर यष्टीरक्षणातही चुका टाळाव्या लागणार आहे. मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेल आजच्या सामन्यातही प्रभाव पाडतील अशी आशा बंगळूरचा संघ करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT