rcb vs gt ipl-2023 Rain Likely To Spoil RCB Chances Of Playoffs Qualification bengaluru-rain-weather-update cricket news in marathi  
IPL

RCB vs GT: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सोबत झाला मोठा गेम, मैदानात उतरण्याआधीच प्रवास संपणार?

प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी RCBला हा सामना जिंकावा लागेल मात्र...

Kiran Mahanavar

IPL 2023 RCB Chances Of Playoffs Qualification : आयपीएल 2023 च्या शेवटच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. गतविजेता गुजरात गुणतालिकेत अव्वल आहे आणि त्यांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या बाबतीत असे नाही. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी संघाला हा सामना जिंकावा लागेल. सामना न जिंकताही संघाला पुढील फेरी गाठता येईल, मात्र त्यासाठी इतर सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.

कर्नाटकची राजधानी बंगळुरूच्या अनेक भागात शनिवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला. 30-40 किमी वेगाने वारे वाहत आहेत. चिन्नास्वामी स्टेडियमवरही पाऊस झाला. त्यामुळे खेळाडू उशिराने नेट प्रॅक्टिसला उतरले. भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार पुढील पाच दिवस शहरात पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.

AccuWeather नुसार, पावसामुळे खेळात व्यत्यय येऊ शकतो. दुपारी एक वाजल्यापासून दिवसभर पाऊस आणि सरी पडण्याची शक्यता आहे. सामन्याच्या वेळेत पावसाची 50% पेक्षा जास्त शक्यता आहे. रात्री 8 नंतर पावसाची 70 टक्के शक्यता आहे. एम चिन्नास्वामी मैदानावरील ड्रेनेज व्यवस्था उत्तम असली तरी. सँड बेस आउटफिल्डमुळे पाऊस संपल्यानंतर काही वेळात सामना सुरू होऊ शकतो.

पावसामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा अंतिम सामना झाला नाही, तर त्यांना फक्त एक गुण मिळेल. अशा स्थितीत मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादला हरवले तर आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचता येणार नाही. मात्र जर मुंबई हरली, तर सामना रद्द झाल्यानंतर किंवा अनिर्णित राहिल्यानंतरही आरसीबीला प्लेऑफमध्ये स्थान मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

महावितरणचा दरवाढीचा शॉक! वीज होणार महाग, प्रति युनिट 'इतके' पैसे द्यावे लागणार जास्त

Kolhapur Accident : संतोष आणि मोहम्मद जिवलग मित्र पण नियतीच्या मनात वेगळ होतं..., दुचाकींच्या धडकेत दोघे मित्र ठार

Latest Marathi News Live Update: छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर अर्धा तास रस्ता रोको आंदोलन

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

SCROLL FOR NEXT