RCB vs PBKS IPL 2024 Virat Kohli Dinesh Karthik News Marathi sakal
IPL

RCB Vs PBKS IPL 2024 : दिनेश कार्तिकचा चमत्कार... RCB ने बालेकिल्लात उघडले विजयाचे खाते

आयपीएल 2024 मध्ये हे चालले तरी काय आहे.... आतापर्यंत चार दिवसात सहा सामने खेळल्या गेले... आणि प्रत्येक सामन्यात एक सेम गोष्ट घडली, ती म्हणजे होम ग्राउंडवर खेळणार संघ मैदाना मारतोय.

Kiran Mahanavar

आयपीएल 2024 मध्ये हे चालले तरी काय आहे.... आतापर्यंत चार दिवसात सहा सामने खेळल्या गेले... आणि प्रत्येक सामन्यात एक सेम गोष्ट घडली, ती म्हणजे होम ग्राउंडवर खेळणार संघ मैदाना मारतोय.

या हंगामाच्या पहिल्या सामन्यापासून आतापर्यंत घरच्या मैदानात खेळणाऱ्या संघांचाच बोलबाला राहिलेला दिसून आला आहे. असेच काहीस पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू यांच्यात सामन्यात देखील पाहिला मिळले.

भारतातील छोटे ग्राउंड.... जेथे फक्त षटकार आणि चौकारचा पाऊस पडतो... ते म्हणजे बेंगळुरूचा बालेकिल्ला एम चिन्नास्वामी स्टेडियम! जेथे आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि दिनेश कार्तिकने पंजाब किंग्जच्या गोलंदाजांसोबत धावांची रगंपचमी खेळली, आणि संघाला 4 गडी राखून विजय मिळवून दिला. या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल 2024 हंगामात त्यांचे खाते उघडले आहे.

या सामन्यात फाफ ड्युप्लेसीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जो कुठे तरी सुरूवातीला योग्य ठरला असे चित्र दिसत होते. कारण तिसऱ्याच षटकात मोहम्मद सिराजने जॉनी बेअरस्टोला आठ धावांवर बाहेर रस्ता दाखवला.

पण त्यानंतर पंजाबचा कर्णधार शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंग या जोडीने आरसीबीच्या गोलंदाजावर हल्ला चढवला. आणि पुन्हा तुफानी शैलीत फटकेबाजी सुरू केली. पण या दोघांच्या पार्टनरशिपला ग्लेन मॅक्सवेलने ब्रेक लावला, आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात प्रभसिमरन 25 धावांवर बाद झाला. या दोघांनी पंजाबसाठी 55 धावांची भागीदारी करीत मोलाची कामगिरी बजावली.

त्यानंतर अल्जारी जोसेफने लियाम लिव्हींगस्टोनला 17 धावांवर तर मॅक्सवेलने 13व्या षटकांत धवनला 45 धावांवर बाद करत पंजाबला बॅक फूट ढकलले. आणि पंजाबची अवस्था चार बाद 98 धावा अशी झाली.

शेवटी शेवटी सॅम करन, जितेश शर्मा व शशांक सिंग यांनी छोट्या पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या. त्याचमुळे पंजाबला 20 षटकांत सहा बाद 176 धावा करता आल्या.

पंजाबकडून बंगळूरसमोर 177 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. असे वाटत होते की, बेंगळुरूचा संघ ही मॅच आरामात मारल. पण पंजाबच्या कागिसो रबाडा व हरप्रीत ब्रार यांच्या प्रभावी गोलंदाजीपुढे आरसीबीच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. फाफ ड्युप्लेसी तीन, कॅमेरुन ग्रीन पण तीन आणि ग्लेन मॅक्सवेल पण तीन धावा करून आऊट झाला.

त्यानंतर विराट कोहलीने अनूज रावतच्या साथीने बंगळूरचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. विराटने 49 चेंडूंमध्ये 11 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 77 धावांची खेळी केली; पण हर्षल पटेल त्याला आऊट करत तंबूत पाठवले, त्याच्याच पुढच्या षटकात सॅम करनने अनूजला पायचीत करत, आरसीबीला पराभवाच्या जाळ्यात टाकलं.

पण त्यानंतर आल्या दिनेश कार्तिक व महिपाल लोमरोर या जोडीने पंजाबच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. संघाला 20 व्या षटकात विजयासाठी 10 धावांची गरज होती. स्टार फिनिशर दिनेश कार्तिकने अर्शदीप सिंगविरुद्ध पहिल्या चेंडूवर षटकार मारला, दुसरा चेंडूवर त्याने शानदार चौकार मारून बंगळूरच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT