Ricky Ponting on Virat Kohli eSakal
IPL

Virat Kohli: कोहलीला संघात न घेण्यासाठी भारतात कारणे का शोधतात? विराटसाठी दिग्गज खेळाडूची ‘बॅटिंग’

Why India find reasons not to include Kohli in the team? या आयपीएलमध्ये विराट कोहली कमालीचे सातत्य दाखवत आहे. १४ सामन्यांत मिळून त्याने एका शतकासह सर्वाधिक ७०८ धावा केल्या आहेत; परंतु स्ट्राईक रेटवरून त्याच्यावर टीका केली जात आहे.

Kiran Mahanavar

Ricky Ponting on Virat Kohli T20 World Cup 2024 : विराट कोहलीला संघात न घेण्यासाठी भारतात कारणे का शोधतात? ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी माझी पहिली पसंती विराट कोहली हीच असती, अशा शब्दात ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार रिकी पाँटिंगने विराटसाठी बॅटिंग केली आहे.

या आयपीएलमध्ये विराट कोहली कमालीचे सातत्य दाखवत आहे. १४ सामन्यांत मिळून त्याने एका शतकासह सर्वाधिक ७०८ धावा केल्या आहेत; परंतु स्ट्राईक रेटवरून त्याच्यावर टीका केली जात आहे.

विराट कोहलीचा दर्जा आणि अनुभव याची तुलना कोणाबरोबरही होऊ शकत नाही किंवा दुसरा कोणताही तेवढा सक्षम पर्यायही नाही, त्यामुळे माझ्यासाठी विराट हा पहिल्या पसंतीचा खेळाडू आहे, असे सांगून पाँटिंग म्हणतो, हा प्रकार केवळ हास्यास्पद आहे, कारण भारतातील लोक नेहमीच कारणांचा शोध घेत असतात किंवा तो इतर काही खेळाडूंपेक्षा सरस ठरणार नाही, असे सांगतात.

येत्या विश्वकरंडक स्पर्धेत विराटने रोहित शर्मासह सलामीला खेळावे. सूर्यकुमारसारखे खेळाडू मधल्या फळीत सरासरी उंचावण्यासाठी सक्षम आहेत, असेही पाँटिंगने सुचवले आहे. निवड समितीला हा निर्णय घ्यावा लागेल, कारण यशस्वी जयस्वाल हा तेवढासा फॉर्मात नाही. डावखुरा फलंदाज म्हणून त्याला संघात ठेवायचे असेल तर मधल्या फळीत खेळवावे, असे पाँटिंगने सुचवले आहे.

कोहलीने यंदाच्या आयपीएलमध्ये एक शतक केले आहे. आयपीएलमध्ये त्याचे हे एकूण आठवे शतक आहे. त्याच्या अशा सातत्यपूर्ण कामगिरीमुळे बंगळूर संघाला यंदाच्या स्पर्धेत प्ले ऑफ गाठता आलेला आहे.

विराटच्या स्ट्राईक रेटबाबत बोलले जात असले तरी यंदाच्या स्पर्धेत त्याचा स्ट्राईक रेट १५५.६० इतका आहे. गेल्या १७ वर्षांतील हा त्याचा सर्वोत्तम स्ट्राईक रेट आहे. सध्याच्या युगात सरासरीपेक्षा स्ट्राईक रेटला अधिक महत्त्व दिले जाते; परंतु विराटच्या भारतीय संघातील उपयुक्ततेला दुसरा पर्याय नाही, असे पाँटिंगने सांगितले.

तीन-चार वर्षांपूर्वी वरच्या क्रमांकावर खेळणारा फलंदाज ६० चेंडूत ८० किंवा १०० धावा करत होता त्यासुद्धा पुरेशा होत्या. त्यावेळी कोणी स्ट्राईक रेटबाबत बोलत नव्हते; परंतु आता सर्वाधिक चर्चा स्ट्राईक रेटची असते. ५५ चेंडूत ८० धावांऐवजी १५ चेंडूत ४० धावा यांना अधिक महत्त्व दिले जाते, अशी तुलना पाँटिंगने केली.

२०२२ मधील ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत विराटने पाकिस्तानविरुद्ध ८२ धावांची जबरदस्त खेळी केली होती. त्यानंतर उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्धही अर्धशतक केले होते. कठीण परिस्थितीत भरवसा सिद्ध करणारा फलंदाजच महान असतो, असे पाँटिंगने म्हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : गणपतीला कोकणात गेलेले परतीच्या मार्गावर, रेल्वे स्टेशनवर तुडुंब गर्दी

Karul Ghat Road Close : करूळ घाट प्रवासासाठी अतिशय धोकादायक, तज्ज्ञांकडून सर्वेक्षण; दरड हटविण्याचे काम थांबविले

Pitru Paksha 2025: आजपासून पितृपक्ष सुरू, नवपंचम राजयोगाचे दुर्मिळ संयोजन, 'या' 3 राशींसाठी सुरू होईल गोल्डन टाइम

Vijay Mallya : विजय माल्ल्या, नीरव मोदीचे लवकरच प्रत्यार्पण ? ब्रिटीश टीमने केला तिहार जेलचा दौरा

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल,आधुनिक स्वयंचलित तराफ्याद्वारे होणार विसर्जन

SCROLL FOR NEXT