Ricky Ponting | World Cup 2003 Final Sakal
IPL

Ponting on Spring Bat: अखेर पाँटिंगच्या स्प्रिंग बॅटचं रहस्य आलं समोर! स्वतःच केला 2003 वर्ल्ड कप फायनलचा मोठा खुलासा

World Cup 2003, India vs Australia Final: भारताविरुद्ध 2003 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पाँटिंगने फलंदाजी करताना वापरलेल्या बॅटमध्ये स्प्रिंग असल्याच्या चर्चा दोन दशकापासून होत आहेत. मात्र, आता याबाबत स्वत: पाँटिंगनेच खुलासा केला आहे.

Pranali Kodre

Ricky Ponting on Spring Bat: साल 2003 मध्ये वनडे वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आला होता. या स्पर्धेत अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतविरुद्ध 125 धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. या पराभवासह भारताचं मात्र विश्वविजयाचं स्वप्न तुटलं होतं. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा हिरो ठरलेला रिकी पाँटिंग.

रिकी पाँटिंगने त्या सामन्यात 121 चेंडूत तब्बल 140 धावांची नाबाद खेळी केली होती. त्याने या खेळीत 4 चौकार आणि 8 षटकार ठोकले होते. त्याच्या या खेळीनंतर अशी चर्चा सुरू झाली होती की त्याच्या बॅटमध्ये स्प्रिंग होती. विशेषत:ही चर्चा भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये सर्वाधिक झाली.

आजही 90 च्या दशकात जन्मलेले अनेक क्रिकेट चाहते याबद्दल बोलतानाही दिसतात. त्यामुळे अखेर यावर स्वत: रिकी पाँटिंगनेच मौन सोडलं असून खरं काय ते सांगितलं आहे.

सतिश रे या इंस्टाग्राम युजरबरोबर त्याने बोलताना यावर भाष्य केलं आहे, हा व्हिडिओ दिल्ली कॅपिटल्सबरोबर कोलॅबरेट करण्यात आला आहे. पाँटिंग आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा प्रमुख प्रशिक्षक आहे.

या व्हिडिओमध्ये सतिश पाँटिंगला गमतीशीर पद्धतीने स्प्रिंग बॅटबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहे. त्यावर पाँटिंगही त्याची मजा घेताना दिसत आहे. व्हिडिओच्या अखेरीस पाँटिंग त्याच्या बॅटमध्ये स्प्रिंग नसल्याचा खुलासा करतो.

तो शेवटी म्हणाला, 'स्प्रिंग बॅट? मी कधीही अशा स्प्रिंग बॅटबद्दल ऐकलेलं नाही. काय असते स्प्रिंग बॅट? बॅटच्या हँडेलमध्ये स्प्रिंग असते की बॅटच्या आत असते? नक्कीच याबाबत भारतात अधिक चर्चा झाली, ऑस्ट्रेलियात नाही. स्प्रिंग बॅट सारखा कोणताही प्रकार नसतो. तुम्हाला जाऊन मेहनत करण्याशिवाय पर्याय नसतो.'

यातून पाँटिंगने त्याची फलंदाजी म्हणजे त्याने घेतलेल्या मेहनतीचे फळ असल्याचे सुचवले आहे.

दरम्यान, पाँटिंगने 2020 मध्येही 2003 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात वापरलेल्या बॅटचे फोटो शेअर केले होते आणि बॅटमध्ये स्प्रिंग असलेल्या चर्चा केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले होते.

साल 2003 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले होते. ऑस्ट्रेलियाकडून पाँटिंग व्यतिरिक्त डॅमियन मार्टिन (88*) आणि ऍडम गिलख्रिस्ट (57) यांनी अर्धशतकं केली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 2 बाद 359 धावा उभारल्या होत्या. भारताकडून हरभजन सिंगने 2 विकेट्स घेतल्या होत्या.

त्यानंतर 360 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा संघ 39.2 षटकात 234 धावांवर सर्वबाद झाला होता. त्यावेळी विरेंद्र सेहवागने 82 धावांची खेळी केली होती, तर राहुल द्रविडने 47 धावा केल्या होत्या. मात्र अन्य बाकी कोणाला खास काही करता आले नव्हते. ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Scam: ‘वॉटर बिल अपडेट करा अन्यथा पाणी बंद’ अशा धमकीने; उद्योजकाला ५४ लाखांचा गंडा

CM Devendra Fadnavis: रस्ता रुंदीकरणाला पाठिंबा; मुख्यमंत्री फडणवीस; गरज असेल तिथे भूसंपादन

Illegal Sand Mining: सुखना नदीतून वाळू उपसा करणारे जेरबंद; पाचजणांवर गुन्हा; पाच ट्रॅक्टरसह तीस लाखांचा मुद्देमाल जप्त

Manmad News : इंदूर-पुणे महामार्गावर कंटेनर अपघात; मनमाडजवळ वाहतुकीचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Updates : पालकमंत्री अतुल सावे यांची गाडी गावकऱ्यांनी अडवली

SCROLL FOR NEXT