virat kohli sourav ganguly 
IPL

IPL 2023 : विराट अन् गांगुलीचे भांडण आले सर्वांसमोर; VIDEO वरून क्रिकेट विश्वात खळबळ

Kiran Mahanavar

IPL 2023 Virat Kohli on Sourav Ganguly : आयपीएल-2023 च्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने शनिवारी दिल्ली कॅपिटल्सवर 23 धावांनी विजय नोंदवला. दरम्यान बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एक विचित्र दृश्य पाहायला मिळाले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या नात्यातील दरी स्पष्टपणे दिसत होती.

बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर शनिवारी हाय व्होल्टेज आयपीएल सामना झाला. आरसीबीने हा सामना जिंकला आणि दिल्ली कॅपिटल्सला हंगामातील सलग 5व्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यातील फलंदाज विराट कोहली आणि दिल्ली कॅपिटल्सचे संचालक सौरव गांगुली यांनी हातात हात दिला नाहीत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली.

कर्णधार कोहलीने दिल्ली कॅपिटल्सवर आरसीबीच्या विजयात मोलाचे योगदान दिले. ओपनिंग करताना त्याने 34 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 50 धावा केल्या. तो त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. याआधी कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या लढतीत आरसीबीचा पराभव झाला होता. सामना संपल्यानंतर खेळाडूंनी एकमेकांशी हस्तांदोलन करताच विराट आणि गांगुली यांच्या नात्यात दुरावा असल्याचे दिसून आले. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आरसीबी आणि दिल्ली यांच्यातील सामन्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफने हस्तांदोलन करून खिलाडूवृत्ती दाखवली. कोहली आणि गांगुली यांनी हस्तांदोलन केले नसल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. कोहली दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्यात चर्चा सुरू होती. त्यानंतर विराट कोहलीला हस्तांदोलन न करता गांगुली रांगेत पुढे गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejas Fighter Jet Crash: वडील युट्यूबवर एअर शोचे व्हिडिओ स्क्रोल करत होते... तेवढ्यात विंग कमांडर मुलाच्या मृत्यूची बातमी कळली

Latest Marathi News Live Update : राज्यात थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Ind vs SA 2nd Test : रिषभ पंतच्या नेतृत्वाची 'टेस्ट'! आजपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना, मायदेशातील प्रतिष्ठा पुन्हा पणास

Pune Book Festival : पुणे पुस्तक महोत्सवाचा श्रीगणेशा; फर्ग्युसनच्या मैदानावर १३ ते २१ डिसेंबरपर्यंत साहित्य मेळा

बाबो ही तर सेम आलियाचं दिसते! ऊत सिनेमातील आर्या सावे म्हणाली, 'पण माझी आवडती अभिनेत्री...'

SCROLL FOR NEXT