Rinku Singh IPL 2024 Marathi News  sakal
IPL

IPL 2024 : मैदानात असे काय घडले की रिंकू सिंगने मागितली माफी? व्हिडिओ होतोय व्हायरल

kolkata knight riders IPL 2024 : आयपीएलची प्रतीक्षा आता संपणार आहे. आणि पुन्हा एकदा ही क्रिकेट लीग 22 मार्चपासून सुरू होत आहे. लीगचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे.

Kiran Mahanavar

kolkata knight riders IPL 2024 : आयपीएलची प्रतीक्षा आता संपणार आहे. आणि पुन्हा एकदा ही क्रिकेट लीग 22 मार्चपासून सुरू होत आहे. लीगचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. दरम्यान कोलकाता नाइट रायडर्स (KKR) फलंदाज रिंकू सिंगचा सराव करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होत आहे.

इंडियन प्रीमियर लीग 2024 पूर्वी रिंकू सिंग सराव करत आहे. यादरम्यान तो त्याने एक मोठा शॉट खेळला. जो एका मुलाच्या डोक्याला लागला. यानंतर रिंकूने त्या मुलाची भेट घेऊन त्याची प्रकृती विचारली आणि त्याला एक अप्रतिम भेटही दिली.

कोलकाता नाईट रायडर्सने मंगळवारी 12 मार्च रोजी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. यामध्ये रिंकू सिंग त्या मुलाकडे जाऊन माफी मागताना दिसत आहे. रिंकूसोबत केकेआरचे फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायर देखील येथे दिसत आहे, ज्यांनी त्या मुलाला कोलकाता नाईट रायडर्स कॅप दिली. त्यावर रिंकूने ऑटोग्राफ दिला.

रिंकू सिंगने आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी चमकदार कामगिरी केली होती. यानंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळाले. येथे त्याने फिनिशर म्हणून त्याने चमकदार कामगिरी केली. रिंकूने पदार्पणानंतर 15 सामन्यात 356 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 176.23 आणि सरासरी 89 आहे. त्याने 2 अर्धशतके झळकावली आहेत.

जूनमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात रिंकू सिंगची निवड निश्चित आहे. तो फिनिशर म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. भारताचे कर्णधार रोहित शर्माकडे असेल, जो नुकताच एक वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर टी-20 फॉरमॅटमध्ये परतला आहे. रोहितसोबत विराट कोहलीही टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची शक्यता आहे. भारत 5 जूनला आयर्लंडविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीदरम्यान निवडणूक आयोगात मोठे फेरबदल; मतदारयादी विभागातील अधिकाऱ्यांची बदली

वयाच्या २६ व्या वर्षी ७५ लाखांची संपत्ती! १८ हजारांच्या पगारापासून सुरू झाला प्रवास

वयाच्या ६० व्या वर्षीही मिलिंद सोमण अनवाणी धावतात! पायांच्या स्नायूंना होतात 'हे' फायदे; पण ही काळजी घ्या

सायन रुग्णालयात डॉक्टरने जीवन संपवलं; स्वत:लाच सलाईन लावत ॲनस्थेशियाचा ओव्हरडोस घेतला, बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News : सीजेपी आंदोलकांची पुण्यात धरपकड

SCROLL FOR NEXT