Rishabh Pant Ruled Out Of World Cup 2023 
IPL

Team India: भारतीय संघासाठी वाईट बातमी! आशिया चषकापाठोपाठ वर्ल्डकप मधूनही दिग्गज खेळाडू बाहेर?

भारत या वर्षाच्या अखेरीस एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धाचा थरार रंगणार आहे त्याआधी....

Kiran Mahanavar

Rishabh Pant Ruled Out Of World Cup 2023 : भारत या वर्षाच्या अखेरीस एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धाचा थरार रंगणार आहे. त्याआधी टीम इंडिया आशिया चषकासाठी आपली तयारी मजबूत करेल. या दोन मोठ्या स्पर्धांमध्ये अजून बराच वेळ आहे, पण त्याआधीच संघाला मोठा धक्का बसला आहे.

भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेत खेळणे कठीण आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार अपघातात जखमी झालेला पंत या दोन मोठ्या टूर्नामेंटमधून बाहेर पडला आहे.

अहवालानुसार, ऋषभ पंतच्या पुनरागमनासाठी थोडा वेळ लागेल आणि जर तो जलद बरा झाला तर पुढच्या वर्षी जानेवारीपर्यंत तो पुन्हा मैदानात उतरू शकतो. गेल्या वर्षी 30 डिसेंबरला घरी जात असताना उत्तराखंडमधील रुरकी येथे पंतचा कार अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा जीव थोडक्यात बचावला. पंतच्या शरीराच्या अनेक भागांना दुखापत झाली होती. आता त्याच्या दुखापतीत हळूहळू सुधारणा होत आहे.

ऋषभ पंत जरी क्रिकेट खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त झाला तरी त्याला यष्टिरक्षणासाठी तयार होण्यास बराच वेळ लागू शकतो. तो फलंदाज म्हणून प्रथम पुनरागमन करू शकतो. पंत मैदानात परतण्याचे धाडस दाखवत असल्याचे मानले जात आहे. बीसीसीआयही त्यांना सर्वतोपरी मदत करत आहे. पंतवर जानेवारीमध्ये लिगामेंट टीयरची शस्त्रक्रिया झाली होती.

ऋषभ पंतने शेवटचे डिसेंबरमध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसनासाठी गेल्यावर त्याच्या परतीची नेमकी वेळ कळेल.

अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सच्या आयपीएल सामन्यादरम्यान पंत अलीकडेच क्रॅचवर चालताना दिसला. बंगळुरूमध्ये संघाच्या सराव सत्रादरम्यानही तो दिसला होता. पंतला कोणत्याही मदतीशिवाय चालायला काही आठवडे लागू शकतात. असे दिसते आहे की पंत वेगाने बरा होत आहे, परंतु मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी तो पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी त्याला सात ते आठ महिने लागू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT