IPL Auction 2024 Rishabh Pant Marathi News  
IPL

IPL Auction 2024 : लिलावात ऋषभ पंत देखील लावणार खेळाडूंवर बोली, म्हणाला "लहानपणीचे स्वप्न.. "

Kiran Mahanavar

IPL Auction 2024 Rishabh Pant : भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत यावेळी लिलावात एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. ऋषभ पंत स्वतः दिल्ली कॅपिटल्सच्या लिलावाच्या टेबलावर बसून खेळाडूंवर सट्टा लावणार आहे. या भूमिकेत दिसणारा तो सर्वात तरुण भारतीय क्रिकेटपटू आहे. सहसा खेळाडू निवृत्तीनंतर या भूमिकेत दिसतात.

ऋषभ पंत 2022 च्या अखेरीस रस्ता अपघातात बळी ठरला होता. या अपघातात त्यांला गंभीर दुखापत झाली होती, अपघातानंतर पंतवर अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि त्याला बरे होण्यासाठी बराच वेळ लागला. मात्र, शस्त्रक्रियेनंतर तो झपाट्याने बरा झाला असून तो लवकरच मैदानात खेळताना दिसु शकतो.

सध्या ऋषभ पंत जिममध्ये घाम गाळत आहे आणि कसरती करून दीर्घकाळ विकेटकीपिंग आणि फलंदाजीसाठी स्वत:ला तयार करत आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने त्याला नवी भूमिका दिली आहे. लिलावादरम्यान तो संघाच्या टेबलवर असेल. पंत स्वत: खेळाडूंवर बोली लावणार आहे आणि आयपीएल सामन्यांदरम्यान कर्णधार करताना त्याच खेळाडूंसोबत मैदानावरही दिसणार आहे.

लिलावातील आपल्या नव्या भूमिकेबाबत तो म्हणाला की, लहानपणापासूनच त्याची इच्छा होती की, आयपीएलमधील एखाद्या संघासाठी काही भूमिकेत योगदान दिले तर बरे होईल. आणि आता हे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे मी खूप आनंदी आहे.

मैदानात परत येण्याबाबत तो म्हणाला की, ते खूप अवघड होते. सुरुवातीला खूप वेदना सहन कराव्या लागल्या, पण हळूहळू गोष्टी सोप्या झाल्या आणि आता लवकर मी मैदानात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Transaction Charges: 2000 रुपयांपेक्षा अधिकच्या यूपीआय व्यवहारांवर 0.4 टक्के टॅक्स; 'या' ग्राहकांसाठी मात्र UPI सेवा मोफत

''तर तोंड काळं करायची वेळी आली असती'', राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेला CM फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर...

IND vs AFG 2nd T20I: 'Toss' चा 'BOSS'! श्रेयस अय्यरने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; वरूण चक्रवर्तीला नेमकं काय झालं? BCCI म्हणते...

Pune News : पुण्याच्या चारीही दिशांना स्वतंत्र डंबर प्लांट उभारा; महापौर नागपुरे यांचे आयुक्तांना पत्र

Hingoli News : चोंडीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली! ‘जमीन गेली तर जगायचे कसे?’ वृद्ध महिला शेतकऱ्यांचा आक्रोश; तुषार जाधव यांचा पालकमंत्र्यांना थेट इशारा

SCROLL FOR NEXT