riyan parag behavior for r ashwin
riyan parag behavior for r ashwin 
IPL

20 वर्षीय खेळाडू अश्विनवर चिडाला; सोशल मीडियावर चाहते म्हणाले...

Kiran Mahanavar

कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर आयपीएल २०२२ चा पहिल्या क्वालिफायर सामना खेळला गेला. डेव्हिड मिलरच्या अर्धशतकाच्या जोरावर गुजरात टायटन्सने कालच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सात विकेटने पराभव केला. पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धा खेळणारा गुजरात संघ पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर होता.

गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करताना राजस्थानने 6 गडी गमावून 188 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने तीन चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला. पण राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजी दरम्यान असे काही घडले, जे क्रिकेट चाहत्यांना अजिबात आवडले नाही.

सामन्यादरम्यान एक क्षण असा आला जेव्हा 20 वर्षी रियान पराग रविचंद्रन अश्विनवर रागावताना दिसला. ही घटना राजस्थानच्या डावाच्या शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळाली. 20 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जोस बटलर धावबाद झाला पण ता चेंडू नो बॉल होता, त्यानंतर रविचंद्रन अश्विन स्ट्राइकवर आला आणि रियान पराग नॉन-स्ट्राइक एंडवर उभा होता. त्यानंतर असे झाले की यश दयालने शेवटचा चेंडू वाईड टाकला. स्ट्राइक घेण्यासाठी पराग धावला, पण रविचंद्रन अश्विन त्याच्या जागेवरून अजिबात हलला नाही.

रियान पराग अर्ध्या खेळपट्टीवर आलो तेवढ्यात तो धावबाद झाला. रियान पराग रविचंद्रन अश्विनकडे रागाने पाहत होता. रियान पराग ज्या पद्धतीने रविचंद्रन अश्विनकडे पाहत होता, ते चाहत्यांना अजिबात आवडले नाही. रियान परागच्या या वागण्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. रविचंद्रन अश्विनसारख्या ज्येष्ठ खेळाडूसोबतच्या या वागणुकीबद्दल चाहत्यांनी त्याला जोरदार ट्रोल केले आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सला गुजरात टायटन्स कडून 7 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: मोदीजी हिंमत असेल तर संपवण्याचा प्रयत्न करुन बघा...; उद्धव ठाकरेंचं थेट आव्हान

PM Modi In Mumbai: राहुल गांधींना फक्त एक गोष्ट करायला सांगा; पंतप्रधान मोदींचे शरद पवारांना आव्हान

Raj Thackeray: मराठीला अभिजात दर्जा, मराठ्यांचा इतिहास अन् मुंबई-गोवा महामार्ग...; राज ठाकरेंनी मोदींकडं व्यक्त केल्या ७ अपेक्षा

RCB vs CSK : खेळ आरसीबी, सीएसके अन् पावसाचा; प्ले ऑफचा चौथा संघ ठरवणारा सामना

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर

SCROLL FOR NEXT