Rohit Sharma and Virat Kohli Marathi News 
IPL

Team India : रोहित-विराटची T20 कारकीर्द संपली! वर्ल्ड कप 2024 मध्ये हा खेळाडू टीम इंडियाचा कर्णधार

Kiran Mahanavar

Rohit Sharma and Virat Kohli : टीम इंडियाने 2007 पासून टी-20 विश्वचषक जिंकलेले नाही. गेल्या टी-20 विश्वचषकातही टीम इंडियाची कामगिरी काही चांगली राहिली नव्हती. अशा स्थितीत माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात अनेक नवीन चेहऱ्यांची अपेक्षा आहे.

रवी शास्त्री यांनी मोठे विधान करताना या स्पर्धेत टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या खेळाडूचे नाव दिले आहे. त्याचबरोबर त्याने विराट कोहली आणि रोहित शर्माच्या टी-20 करिअरवरही मोठे वक्तव्य केले आहे.

टीम इंडियाने टी-20 मध्ये विराट कोहली-रोहित शर्माला सोडून पुढे जावे आणि आता युवा खेळाडूंना संघात संधी दिली पाहिजे, असे मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना रवी शास्त्री म्हणाले, 'आयपीएलनंतर टीम इंडिया जी काही पहिली टी-20 मालिका खेळेल त्यात युवा खेळाडूंना संधी दिली पाहिजे.

रोहित आणि विराट कोहलीसारख्या खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध केले आहे. ते काय आहेत, हे कोणापासून लपलेले नाही. पण आता मला युवा खेळाडूंसोबत जायला आवडेल. जेणेकरून विराट आणि रोहितसारखे खेळाडू वनडे आणि कसोटी क्रिकेटसाठी फ्रेश राहतील.

रवी शास्त्री म्हणाले, टी-20 विश्वचषक येत आहे आणि तरुणांमध्ये भरपूर टॅलेंट आहे, आपल्या यंदाच्या आयपीएलमध्ये काही उत्तम टॅलेंट पाहायला मिळाले. हा पूर्णपणे नवीन संघ नसून त्यात अनेक नवे चेहरे असतील. हार्दिक पांड्या आधीच या फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार आहे. फिटनेसची समस्या नसल्यास तो संघाचे नेतृत्व करत राहील. टी-20 वर्ल्ड कप 2022 पासून हार्दिक पांड्या भारतीय टी-20 टीमची जबाबदारी सांभाळत आहे. त्याचवेळी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला या स्पर्धेपासून टी-20 संघात स्थान मिळालेले नाही.

रोहित शर्मा आतापर्यंत आयपीएल 2023 मध्ये आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला आहे. रोहित शर्माने या हंगामात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 12 सामन्यांमध्ये 18.33 च्या खराब सरासरीने केवळ 220 धावा केल्या आहेत. यादरम्यान रोहित शर्माला केवळ 1 अर्धशतक झळकावता आले आहे. त्याचबरोबर विराट कोहलीने 12 सामन्यात 438 धावा केल्या आहेत. यादरम्यान विराटचा स्ट्राइक रेट केवळ 131.53 राहिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT