Rohit Sharma IPL 2024 Marathi News sakal
IPL

Rohit Sharma : कुठे गेला रोहित शर्मा? मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये नाही तर.... फोटो होतोय व्हायरल

Rohit Sharma IPL 2024 : आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवण्यात आले, तेव्हा बरीच चर्चा रंगली होती. पण या आता हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली सोमवारी मुंबई इंडियन्सच्या कॅम्पला सुरुवात झाली.

Kiran Mahanavar

Rohit Sharma IPL 2024 : आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवण्यात आले, तेव्हा बरीच चर्चा रंगली होती. पण या आता हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली सोमवारी मुंबई इंडियन्सच्या कॅम्पला सुरुवात झाली.

फ्रँचायझीचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचरही यावेळी दिसले, पण माजी कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीने अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. रोहित शर्मा अजुन या सराव शिबिरात गेला नाही, मात्र रोहित मंगळवारी रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर पोहोचला.

मंगळवारी सामन्यादरम्यान रोहित शर्मा मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्ये दिसला. रोहितचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. त्यात तो वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीसोबत मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्ये दिसत आहे.

धवल कुलकर्णी हा मुंबईचा वेगवान गोलंदाजच नाही तर रोहित शर्माचा खूप चांगला मित्रही आहे. धवल कुलकर्णीने अंतिम सामन्यापूर्वी निवृत्ती जाहीर केली होती. विदर्भाविरुद्ध तो शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळत आहे. रोहितशिवाय सचिनही रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना पाहण्यासाठी आला आहे.

रोहित शर्मा नुकताच इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. मालिकेतील शेवटची कसोटी धरमशाला येथे खेळली गेली. त्या सामन्यात भारताने इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव केला होता. या मालिकेत भारताने इंग्लंडचा 4-1 असा पराभव केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेतल्यानंतर रोहित आता आयपीएलची तयारी सुरू करणार आहे. यंदा रोहितच्या जागी हार्दिक पांड्याला मुंबईचे कर्णधार बनवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT