Rohit Sharma DRS Controversy
Rohit Sharma DRS Controversy sakal
IPL

Rohit Sharma: 'DRS हे जरा जास्तच...' रोहितच्या विकेट वरून गदारोळ! दिग्गज खेळाडूंने उपस्थित केला प्रश्न

Kiran Mahanavar

Rohit Sharma DRS Controversy : आयपीएल 2023 च्या 54 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने बंगळुरूचा 6 विकेटने पराभव केला. मुंबईकडून सर्यकुमार यादवने केवळ 35 चेंडूंत 7 चौकार आणि 6 षटकारांसह 83 धावा केल्या. याशिवाय नेहल बधेराने 34 चेंडूत 52 धावांची नाबाद खेळी केली. दोघांमध्ये तिसर्‍या विकेटसाठी 66 चेंडूत 140 धावांची भागीदारी रचली, ज्यामुळे सामना फिरला.

या सामन्यात रोहित शर्मा पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. तो केवळ सात धावा केल्यानंतर हसरंगाच्या फिरकीला एलबीडब्ल्यू आऊट झाला. रोहित बाद झाल्यानंतर माजी क्रिकेटपटूंनी खळबळ उडवून दिली आहे.

सामन्यात झाले असे की रोहितने हसरंगाच्या चेंडूवर क्रीजच्या पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू त्याच्या पॅडवर लागला, त्यानंतर गोलंदाजाने आऊटचे अपील केले, मैदानावरील पंचांनी अपील फेटाळले. पण आरसीबीकडून डीआरएस घेतला. त्याचवेळी रिप्ले पाहिल्यानंतर तिसऱ्या पंचाने रोहितला एलबीडब्ल्यू आऊट घोषित केले.

रोहितला आऊट घोषित करताच मुंबईच्या कर्णधाराला धक्का बसला आणि तो पॅव्हेलियनच्या दिशेने चालू लागला. त्याचवेळी माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ आणि मुनाफ पटेल यांनी डीआरएस निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

कैफने ट्विट करून लिहिले, 'हॅलो डीआरएस, हे जरा जास्तच नाही का? तो LBW कसा होऊ शकतो? त्याचवेळी भारताचा माजी गोलंदाज मुनाफ पटेलने ट्विट करून हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे.

नियम काय म्हणतो

नियम सांगतो की जेव्हा चेंडू पॅडवर लागतो आणि टप्पावर पडल्यानंतर स्टंपपर्यंत पोहोचण्याचे अंतर 3 मीटरपेक्षा जास्त असते तेव्हा तिसरे पंच नियमानुसार फलंदाजाला नॉट आउट म्हणतात. येथे रोहितच्या बाबतीत असे दिसते की रोहित आणि स्टंपमध्ये 3 मीटरपेक्षा जास्त अंतर होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Bidkin Crime News : धक्कादायक! भीशीचे व व्याजाचे पैसे न दिल्याने महिलेसह पाच मुलांचे अपहरण

Yuzvendra Chahal: ऋषभ पंतची विकेट चहलसाठी ठरली ऐतिहासिक! T20 मध्ये कोणत्याच भारतीयाला न जमलेला केला पराक्रम

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दुसऱ्याच चेंडूवर राजस्थानला मोठा धक्का! जैस्वालला ४ धावांवरच झाला आऊट

SCROLL FOR NEXT