Rohit Sharma MI esakal
IPL

Rohit Sharma SRH vs MI : वेड्या चाहत्यांची वेडी माया... रोहितसाठी चाहते तीन तास उभे राहिले उन्हात

Rohit Sharma IPL 2024 : रोहित शर्मा आज मुंबई इंडियन्सकडून 200 वा सामना खेळणार आहे. त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची रांग लागली आहे.

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma SRH vs MI : रोहित शर्मा आता मुंबई इंडियन्सचा स्टार कर्णधार राहिलेला नाही. मात्र तरी देखील चाहत्यांच्या मनातला मुंबई इंडियन्सचा चेहरा हा रोहित शर्माच आहे. रोहितने मुंबई इंडियन्सला 5 आयपीएल ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. रोहितला मुंबईच्या चाहत्यांनी कायम मोठा पाठिंबा दिला आहे. रोहितची कॅप्टन्सी गेल्यानंतर देखील यात कोणताही बदल झालेला नाही.

याची प्रचिती सनराईजर्स हैदराबाद विरूद्धच्या सामन्यापूर्वी आली. मुंबई इंडियन्सचे चाहते सनराईजर्स हैदराबादच्या उप्पल स्टेडियमबाहेर रोहितची एक झलक पाहण्यासाठी तीन तास उन्हात उभे होते. रोहित मुंबई इंडियन्सकडून आपला 200 वा आयपीएल सामना खेळणार आहे. तो मुंबईकडून 200 वा आयपीएल सामना खेळणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

रोहितचा हा 200 वा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी दुपारी 3.30 पासूनच स्टेडियमबाहेर गर्दी केली होती. यावेळी चाहत्यांनी उन्हाचा देखील चटका सहन केला. या चाहत्यांपैकी अनेकांनी 45 क्रमांकाची जर्सी घातली होती.

मुंबई इंडियन्सचा पोस्टर बॉय

रोहित शर्मा हा 2011 पासून मुंबई इंडियन्सकडून खेळतोय. तो सचिन तेंडुलकरनंतर मुंबईचा पोस्टर बॉय झाला. त्याच्या नेतृत्वाच्या काळात मुंबई इंडियन्सने यशाची अनेक शिखरे गाठली. रोहितने 10 वर्षात मुंबई इंडियन्सला 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे. याचबरोबर त्याने फ्रेंचायजीसाठी 5041 धावा केल्या असून यात 34 अर्धशतके आणि एका शतकाचा देखील समावेश आहे.

मुंबईने नुकतेच रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवले. यावरून अनेक चाहते नाराज झाले अन् मुंबईला अनफॉलो करण्यास सुरूवात केली. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याला ट्रेडद्वारे आपल्या संघात खेचत मुंबईने त्याला थेट रोहितची कर्णधारपदाची खुर्ची दिली.

रोहितवरील अतिरिक्त ताण दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. रोहित भारतीय संघाचे तीनही फॉरमॅटमध्ये नेतृत्व करत आहे. त्याने आयपीएल 2024 च्या हंगामाची दमदार सुरूवात केली. त्याने गुजरातविरूद्धच्या पहिल्याच सामन्यात 43 धावा केल्या.

(IPL Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZP Election 2026 : उर्वरित २० जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचं काय? कधी होणार घोषणा? वाचा...

Voter List: नवीन मतदारांसाठी महत्त्वाची माहिती! मतदार यादीत नाव आहे की नाही? अशा प्रकारे करा खात्री

Crime News : सटाण्यात 'देहविक्रय' करणाऱ्या टोळीला बेड्या; पोलिसांनी १६ हजारांच्या मुद्देमालासह तिघांना पकडले

Alandi Municipal Council : 'बुके ऐवजी बुक' देऊन नवनिर्वाचित नगरसेवकांचे स्वागत; आळंदी पालिकेत भाजपचे निर्विवाद वर्चस्व!

Pune News : चतुःश्रृंगी मंदिरासमोर बेघरांचा ठिय्या; शेकोट्यांमुळे प्रदूषणात वाढ आणि भाविकांची सुरक्षितता धोक्यात!

SCROLL FOR NEXT