IPL: एकमेकांविरुद्ध सामना खेळण्यापूर्वीच रोहितने हार्षित राणावरून मयंक अग्रवालला डिवचलं? Photo होतोय व्हायरल

Rohit Sharma - Mayank Agarwal: मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यापूर्वी रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल सरावादरम्यान भेटले, यावेळीच्या एका घटनेची बरीच चर्चा झाली.
Rohit Sharma - Mayank Agarwal | IPL 2024
Rohit Sharma - Mayank Agarwal | IPL 2024Sakal

Rohit Sharma - Mayank Agarwal: इंडियन प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात बुधवारी सामना होणार आहे. हा सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ हैदराबादमध्ये पोहचले आहेत.

दरम्यान, दोन्ही संघाचा सराव सुरु असताना मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर मयंक अग्रवालशी मस्ती करताना दिसला.

झाले असे की रोहित आणि मयंक हे चांगले मित्र देखील आहेत. त्यामुळे ते सरावादरम्यान एकमेकांना भेटले होते. यावेळी मस्तीमध्ये रोहित मयंकला फ्लाईंग किस देताना दिसला.

Rohit Sharma - Mayank Agarwal | IPL 2024
Ashish Nehra: क्रिकेटचा की फुटबॉलचा प्रशिक्षक? गुरु नेहराजींची का होतेय चर्चा? Video Viral

दरम्यान, रोहितने दिलेल्या या फ्लाईंग किसचा संबंध अनेक चाहत्यांनी हर्षित राणा आणि मयंक अग्रवाल यांच्याच झालेल्या वादग्रस्त घटनेशी जोडला आहे. चाहत्यांनी कयास लावला आहे की रोहित हर्षित राणाच्या फ्लाईंग किसची आठवण मयंक अग्रवालला करून देत मस्ती करत आहे.

हर्षित राणा अन् मयंक अग्रवाल यांच्यात नक्की काय झालेलं?

कोलकाता नाईट रायडर्स आणि सनराझर्स हैदराबाद यांच्यात इडन गार्डन्स संघात कोलकातामध्ये २३ मार्चला सामना झाला होता. हा सामना कोलकाताने अखेरच्या क्षणी ४ धावांनी जिंकला होता.

Rohit Sharma - Mayank Agarwal | IPL 2024
IPL 2024, CSK vs GT: अजिंक्य रहाणेने सूर मारत पकडला मिलरचा 'किलर' झेल, Video होतोय व्हायरल

याच सामन्यात हैदराबादच्या मयंकला कोलकाताकडून खेळणाऱ्या हर्षित राणाने बाद केले होते. तसेच बाद केल्यानंतर त्याने त्याला फ्लाईंग किस देत सेंडऑफ दिला होता. या घटनेची बरीच चर्चा झाली होती.

हर्षितवर झाली कारवाई

दरम्यान, या घटनेनंतर हार्षितवर कारवाईही करण्यात आली होती. त्याच्यावर सामना शुल्काच्या 60 टक्के दंड ठोठावण्यात आला होता. क्रिकेटमध्ये खेळाडूंना अशाप्रकारे डिवचण्याला चूक समजले जाते. त्यामुळे अशावेळी कारवाई केली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com