(Rohit sharma troll 
IPL

IPL: कृपया निवृत्ती घे...मुंबईला सोड...पराभवानंतर रोहित शर्मा ट्रोल

मुंबई इंडियन्सने त्यांच्या पराभवाची परंपरा कायम ठेवली

धनश्री ओतारी

'कृपया आता निवृत्ती घेऊन भारतीय संघ व मुंबई इंडियन्सला सोड', अशी प्रतिक्रिया मुंबई इंडियन्सचा पराभव झाल्यानंतर नेटकरी देताना दिसत आहेत. मुंबई इंडियन्सने त्यांच्या पराभवाची परंपरा कायम ठेवली आहे. मुंबईला यंदाच्या वर्षी देखील पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर कॅप्टन रोहित शर्मा ट्रोल होताना दिसत आहे. (Rohit sharma troll)

आयपीएल 2023 स्पर्धेचा पाचवा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर रंगला. प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हा अपयशी ठरला.

त्याला केवळ एक धाव बनवता आली. इतकेच नव्हे तर मुंबईला यंदाच्या वर्षी देखील पहिल्याच सामन्यात पराभव स्विकारावा लागला. त्याच्या या पराभवावर क्रिकेटप्रेमी चांगलेच संतापले आहेत.

क्रिकेटप्रेमींनी रोहितवरील नाराजी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. 'कृपया आता निवृत्ती घेऊन भारतीय संघ व मुंबई इंडियन्सला सोड’ तसेच, रोहितला बसवून आता अर्जुन तेंडुलकरला संधी देण्याची वेळ आली आहे.

आयपीएल 2023 मध्ये आज पाचवा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात आरसीबीने मुंबई इंडियन्सचा 8 विकेट्सने पराभव केला आहे. या पराभवासोबतच मुंबई इंडियन्सने आपला 10 वर्षांचा इतिहास कायम ठेवला आहे. या सामन्यात विराट कोहली आणि कर्णधार फाफ डु प्लेसिस हे दोघे आरसीबीच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर-मंतरवरील आंदोलनात योगेंद्र यादव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; कपिल सिब्बल, प्रशांत भूषणही आंदोलनात सहभागी

Google वर Customer Care Number Search करताय? थांबा! ‘ही’ चूक तुमचे पैसे उडवू शकते

नवरात्रीत सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाणार? जाणून घ्या तिरक्या मानेमागची रंजक आख्यायिका

Latest Marathi News Live Update : गांधी जयंतीपासून रोजगार सेवकाचे कामबंद आंदोलन

Administrative Reshuffle : प्रशासनात मोठा भूकंप! १५ IAS अधिकाऱ्यांसह ३८ बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पाहा कोणाची कुठे झाली रवानगी?

SCROLL FOR NEXT