Rohit Sharma Hints At India Call up For 20 year old Mumbai Indians Star  
IPL

IPL 2023: टीम इंडियात मुंबई इंडियन्सच्या 'या' खेळाडूची होणार एन्ट्री; रोहित शर्माने दिले संकेत

आता टीम इंडियाच्या ताफ्यात MI चा खेळाडू करणार एन्ट्री

धनश्री ओतारी

मुंबई इंडियन्सने सनराईजर्स हैदराबादचा त्यांच्याच मैदानावर 14 धावांनी पराभव करत आपल्या विजयाची हॅट्ट्रिक नोंदवली. या विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने माध्यमांशी बोलताना भारतीय संघाबाबत भाष्य केलं आहे. त्याने यावेळी मोठं संकेत दिले आहेत. मुंबई इंडियन्सचा असा एक खेळाडू आहे जो लवकरच भारताच्या ताफ्यात सहभागी होणार आहे. (Rohit Sharma Hints At India Call up For 20 year old Mumbai Indians Star)

माध्यमांशी संवाद साधताना रोहितने तिलक वर्माचे तोंडभरुन कौतुक केले आहे. तिलकने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 17 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 37 धावांची तुफानी खेळी केली. यामुळे मुंबई संघाने मोठी धावसंख्या गाठली. रोहितही तिलकच्या खेळीमुळे खूश आहे. त्याने तिलक लवकरच इतर संघात खेळणार असल्याचे संकेत दिले.

हैदराबादमध्ये माझ्या खूप आठवणी आहेत. मी येथे तीन वर्षे खेळलो. ट्रॉफीही जिंकली. इथे पुन्हा खेळायला मला आवडेल. आमच्याकडे असे काही खेळाडू आहेत जे यापूर्वी आयपीएल खेळले नाहीत. पण त्यांच्या पाठीशी उभे रहावे लागेल.

सध्या नवे खेळाडू लय शोधत आहेत. पॉवरप्लेमध्ये काही धावा मिळाल्याचा आनंद आहे. मला वाटते की आपल्यापैकी एकाला मोठी फलंदाजी करावी लागेल. आमची फलंदाजी मोठी आहे. युवा खेळाडूंनी मोकळेपणाने फलंदाजी करावी अशी माझी इच्छा आहे.

तसेच गेल्या सीझनपासून तिलक वर्माला खेळताना पाहिले आहे. तो काय करु शकतो हे सर्वांना माहिती आहे. मला त्याचा दृष्टिकोन आवडतो. तो गोलंदाजी करत नाही पण चेंडूला खेळवतो. अशा शब्दात तिलकचं कौतुक करत आम्ही लवकरच त्याला इतर काही संघांसाठी खेळताना पाहू. असं मोठं विधान रोहितने केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT