Yashasvi Jaiswal - Rohit Sharma Sakal
IPL

RR vs MI: जैस्वालचं शतक अन् रोहितची शाबासकीची थाप; मुंबई-राजस्थान सामन्यातील तो Video चर्चेत

Yashasvi Jaiswal - Rohit Sharma: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सकडून शतक ठोकल्यानंतर यशस्वी जैस्वालला रोहित शर्माकडून शाबासकीची थाप मिळाली होती.

Pranali Kodre

Yashasvi Jaiswal - Rohit Sharma: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत सोमवारी (22 एप्रिल) राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. हा राजस्थानचा यंदाच्या हंगामातील 8 सामन्यांतील 7 वा विजय आहे. राजस्थानच्या या विजयात यशस्वी जैस्वालने शतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला.

दरम्यान, या शतकासह जैस्वालने पुनरागमनही केले. खरंतर आयपीएलपूर्वी जैस्वाल दमदार फॉर्ममध्ये होता. मात्र आयपीएल चालू झाल्यानंतर पहिल्या सात सामन्यांत त्याला एकदाही अर्धशतक झळकावता आले नव्हते.

परंतु, मुंबई इंडियन्सविरुद्ध त्याला लय सापडली आणि त्याने नाबाद शतक केले. त्याच्या शतकानंतर मुंबईचा स्टार फलंदाज रोहित शर्मानेही त्याचे कौतुक केले.

रोहितकडून खास कौतुक

या सामन्यात मुंबईने राजस्थान समोर 180 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना जैस्वालने 60 चेंडूत 9 चौकार आणि 7 षटकारांसह 104 धावांची नाबाद खेळी केली. त्याने शतक झळकावल्यानंतर रोहित शर्माने जाऊन त्याला मिठी मारत त्याचे कौतुक केले. सामन्यानंतरही ते दोघे बोलताना दिसले, याचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

रोहित शर्माबरोबर टी20 वर्ल्डकपमध्ये मिळणार सलामीची संधी?

दरम्यान, जैस्वालने शतक करत आगामी टी20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघातील निवडीसाठी दावेदारी ठोकली आहे. त्याला जर भारतीय टी20 संघात जागा मिळाली, तर तो रोहित शर्मासह अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्डकपसाठी भारताकडून सलामीला फलंदाजी करताना दिसू शकतो.

शतकानंतर काय म्हणाला?

सामन्यानंतर सॅमसन म्हणाला, 'मला सुरुवातीपासूनच खेळायला मजा आली. मी याची काळजी घेतली की मी चेंडू निट पाहिल आणि योग्य क्रिकेटिंग शॉट्स खेळेल. जे मी चांगले करतो, तेच मी करण्याचा प्रयत्न केला. काही दिवस चांगले असतात, काही वाईट.'

'मी फार विचार केलेला नाही. मी माझ्या वरिष्ठांचे आभार मानतो की त्यांनी मला मार्गदर्शन केले. मी राजस्थान रॉयल्सच्या व्यवस्थापनाचे आणि विशेषत: संगकारा सरांचे आणि संजू भाईचे मला संधी दिल्याबद्दल आभार मानतो.मी सराव सत्रात माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो आणि मी खूश आहे.

राजस्थानचा विजय

दरम्यान, जैस्वालच्या शतकाच्या जोरावर राजस्थानने 18.4 षटकात 1 विकेट गमावत 183 धावा करून मुंबईने दिलेलं 180 धावांचं लक्ष्य पूर्ण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT