Rohit Sharma Viral Video Sakal
IPL

Rohit Sharma: रोहित करतोय सचिन, द्रविड अन् भज्जीची भन्नाट नक्कल, Video तुफान व्हायरल

Rohit Sharma Viral Video: रोहित शर्मा सचिन, द्रविडसह भारताच्या स्टार क्रिकेटपटूंची नक्कल करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

Rohit Sharma Viral Video: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत खेळत आहे. तो आयपीएलच्या या 17 व्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत आहे. याचदरम्यान, त्याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा एका मैदानात असून त्याने मुंबई इंडियन्सची जर्सी घातलेली दिसत आहे. या व्हिडिओमध्ये रोहित सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, हरभजन सिंग, युवराज सिंग आणि झहीर खान यांची नक्कल करताना दिसत आहे.

आधी रोहित सचिन तेंडुलकरच्या बॅटिंग स्टान्सची नक्कल करत आहे. तसेच नंतर तो राहुल द्रविडच्या फलंदाजीची नक्कल करत आहे.

त्याचबरोबर त्याने हरभजन सिंगच्या आणि झहीर खान यांच्या गोलंदाजी स्टाईलचीही नक्कल केली, तर युवराज सिंग ज्याप्रकारे चालत येतो, तसेही त्याने करून दाखवले. हा व्हिडिओ सध्या अनेक युजर्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच तो वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

रोहित चांगल्या फॉर्ममध्ये

दरम्यान, रोहितच्या आयपीएल 2024 मधील कामगिरीबद्दल सांगायचे झाले, तर त्याने आत्तापर्यंत 4 सामने खेळले असून 171 च्या स्ट्राईक रेटने 118 धावा केल्या आहेत. 49 धावा ही त्याची आत्तापर्यंतही सर्वोत्तम खेळी आहे.

दरम्यान, यंदा रोहित मुंबईकडून केवळ फलंदाज म्हणून खेळत आहे. आयपीएल 2024 पूर्वी त्याला हटवून हार्दिक पंड्याकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा मुंबई इंडियन्स हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळत आहे.

मुंबईला 17 व्या हंगामात पहिल्या तीन सामन्यात पराभवाचा धक्का बसला. पण पहिल्या तीन पराभवांनंतर मुंबईने चौथ्या सामन्यात विजय मिळवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT