Rohit Sharma | Mumbai Indians | IPL 2024 Sakal
IPL

IPL 2024, MI vs DC: रोहितने तीन शब्दात व्यक्त केला मुंबईच्या पहिल्या विजयाचा आनंद, मात्र पोस्टमधून हार्दिकच गायब

Rohit Sharma Post: रोहित शर्माने मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२४ मधील पहिला विजय मिळवल्यानंतर खास पोस्ट शेअर केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Rohit Sharma Post: इंडियन प्रीमियर लीग २०२४ (IPL 2024) स्पर्धेचा २० वा सामना रविवारी (७ एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या १७ व्या हंगामातील आपला पहिला विजय मिळवत दिल्लीला २९ धावांनी पराभूत केले आहे.

मुंबईच्या फलंदाजी केली, तसेच शेवटच्या षटकात रोमरियो शफर्डने केलेल्या आक्रमणामुळे मुंबई संघ २३४ धावा करु शकला. त्यानंतर दिल्ली संघ २३५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यात अपयशी ठरला. २० षटकात दिल्लीला केवळ २०५ धावा करता आल्या.

पहिला विजय मिळाल्यानंतर मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्माने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने म्हंटल आहे की, 'खाता खुल गया'. या पोस्टमध्ये रोहितने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरुन तीन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये कर्णधार हार्दिक पंड्याचा एकही फोटो नाही.

रोहितने शेअर केलेल्या पहिल्या फोटोत तो रोमारिओ शेफर्डसोबत आनंद साजरा करताना दिसत आहे, दूसऱ्या फोटोत लहान मुले आनंद साजरा करताना दिसत आहेत, तर तिसऱ्या फोटोत दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतसोबत तो दिसत आहे.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईने २० षटकात आपले ५ विकेट्स गमवत २३४ धावा केल्या. मुंबईकडून रोहितने ४९, ईशान किशनने ४२, हार्दिक पांड्याने ३९, टीम डेविडने ४५ आणि रोमारिओ शेफर्डने ३९ धावा केल्या. दिल्लीच्या अक्षर आणि नॉर्कियाने प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

२३५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीच्या पृथ्वी शाॅने ६६, तर ट्रिस्टान स्टब्सने ७१ धावांची अर्धशतकी खेळी केल्या. तसेच अभिषेक पोरेलने ४१ धावा केल्या.

मात्र, अन्य कोणाला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यामुळे दिल्लीला २० षटकात ८ गडी गमावत २०५ धावाच करता आल्या. मुंबईकडून गोलंदाजीत गेराल कोएत्झीने ४ बळी घेतले, तर बुमराहने २ विकेट घेतल्या.

गुणतालिकेत बदल

या विजयानंतर मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर दिल्ली कॅपिटल्स संघ दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. मुंबई इंडियन्स आपला पुढचा सामना ११ एप्रिलला आरसीबीसोबत खेळणार आहे, तर दिल्ली कॅपिटल्सचा पुढचा सामना १२ एप्रिलला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध पार पडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT