IPL 2024 MI vs DC
IPL 2024 MI vs DC sakal
IPL

IPL 2024 MI vs DC : रोमारिओने उभारली मुंबईच्या विजयाची गुढी ; १० चेंडूंत ३९ धावांचे तुफान

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई इंडियन्स संघाला रोमारिओ शेफर्ड हा नवा मॅचविनर सापडला. अद्भूत अशी टोलेबाजी त्याने अखेरच्या षटकात केली, त्यामुळे सव्वादोनशेपार धावा करणाऱ्या मुंबई संघाने दिल्लीचा २९ धावांनी पराभव करून आयपीएलमध्ये आपल्या विजयाची गुढी उभारली. कधीकाळी कायरान पोलार्ड जशी फलंदाजी करायचा त्याची आठवण जागृत करणारा झंझावात रोमारिओने सादर केले. त्याने अवघ्या १० चेंडूंत नाबाद ३९ धावांचे तुफान आणले, त्यामुळे जेमतेम दोनशे धावा करू शकणाऱ्या मुंबईला थेट पाच बाद २३४ धावांपर्यंत झेप घेता आली. यातील ३२ धावा शेफर्डने अखेरच्या षटकांत फटकावून काढल्या. नॉर्कियाच्या या षटकात त्याने तीन षटकार, दोन षटकार मारले.रोमारिओ मैदानात आला तेव्हा मुंबईच्या डावाचे १३ चेंडू शिल्लक होते, त्यातील त्याच्या वाट्याला १० चेंडू आले. त्यातच त्याने संपूर्ण स्टेडियम हादरवून सोडले.

रोहित-ईशानची जोरदार सलामी

गेल्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद झालेल्या रोहित शर्माकडून आज चांगल्या धावांची अपेक्षा होती. त्याने दुसऱ्या षटकांत ईशांत शर्माविरुद्ध दोन चौकार मारून आत्मविश्वास मिळवला. त्यानंतर दिल्लीच्या प्रत्येक गोलंदाजांवर हल्ला केला. दुसरा सलामीवीर ईशान किशनही संधी मिळताच चेंडू सीमापार धाडत होता, त्यामुळे या मोसमात मुंबई संघाला पॉवरप्लेच्या सहा षटकांत ७५ धावांची सलामी मिळाली होती. रोहित ४९ धावांवर पोहोचला होता; पण ज्या अक्षर पटेलच्या पहिल्या षटकांत रोहितने त्याला एक चौकार आणि एक षटकार मारला होता, त्याच अक्षरच्या षटकांत रोहितला तीन चेंडूंत आपली ५०वी धाव काढता आली नाही आणि पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला.

सूर्यकुमारचा भोपळा

मोठ्या अपेक्षा बाळगत पुनरागमन करणारा सूर्यकुमार यादव मैदानात आला; पण दोन चेंडूंत तो शून्यावर बाद होऊन परतला. मुंबई संघाचा आणखी एक भरवशाचा फलंदाज तिलक वर्मानेही अशाचप्रकारे निराशा केली. कर्णधार हार्दिक पंड्याने आज चौथ्या क्रमांकावर बढती घेतली. त्याने ३९ धावा काढल्या; परंतु त्यासाठी ३३ चेंडू घेतले, त्यात त्याला तीन चौकार आणि एक षटकारच मारता आला. गोलंदाजीत त्याने दिल्लीचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा बळीही मिळवला. सलग दुसऱ्या सामन्यात दोनशेपेक्षा अधिक धावांचा पाठलाग करण्याची वेळ आलेल्या दिल्लीला सुरुवातीला वॉर्नरच्या विकेटचा धक्का बसला असला तरी आपल्या घरच्या मैदानावर खेळणाऱ्या पृथ्वी शॉने ४० चेंडूत ६६ धावांचा झंझावात सादर केला.

बुमराची भेदकता

२३५ धावांचे संरक्षण करताना मुंबईला जेव्हा जेव्हा गरज भासली तेव्हा बुमरा मदतीला धावला. प्रथम त्याने एका अप्रतिम यॉर्करवर शॉचा त्रिफाळा उडवला, नंतर अभिषेक पॉरेल डोकेदुखी ठरत असताना त्यालाही बाद केले.

त्रिस्टन स्टब्सचा हल्ला

त्रिस्टन स्टब्स हा गतमोसमात मुंबई संघात होता; परंतु आता दिल्ली संघातून खेळताना त्याने नाबाद ७१ धावांची खेळी करताना मुंबई संघाच्या नाकी दम आणला होता. अखेरच्या षटकांत ३४ धावांची गरज असे समीकरण तयार झाले होते; पण त्याला कलाटणी देता आली नाही.

संक्षिप्त धावफलक : मुंबई २० षटकांत ५ बाद २३४ (रोहित शर्मा ४९ - २७ चेंडू, ६ चौकार, ३ षटकार, ईशान किशन ४२ - २३ चेंडू, ४ चौकार, २ षटकार, हार्दिक पंड्या ३९ - ३३ चेंडू, ३ चौकार, १ षटकार, टीम डेव्हिड नाबाद ४५ - २१ चेंडू, २ चौकार, ४ षटकार, रोमारिओ शेफर्ड नाबाद ३९ - १० चेंडू, ३ चौकार, ४ षटकार, अक्षर पटेल ४-०-३५-२, एन्रिक नॉर्किया ४-०-६५-२)

दिल्ली २० षटकांत ५ बाद २०५ (पृथ्वी शॉ ६६ - ४० चेंडू, ८ चौकार, ३ षटकार, अभिषेक पॉरेल ४१ - ३१ चेंडू, ५ चौकार, त्रिस्टन स्टब्स नाबाद ७१ - २५ चेंडू, ३ चौकार, ७ षटकार, कोएत्झी ४-०-३४-४, जसप्रीत बुमरा ४-०-२२-२)

अखेरच्या पाच षटकांत सर्वाधिक धावा

  • ११२ : बंगळूर वि. गुजरात (बंगळूर २०१६)

  • ९६ : मुंबई वि. पंजाब (वानखेडे २०२३)

  • ९६ : मुंबई वि. दिल्ली (वानखेडे २०२४)

  • ९१ : कोलकता वि. बंगळूर (ईडन गार्डन २०१९)

एकाच संघाविरुद्ध २०० पेक्षा अधिक धावा

  • ६ : बंगळूर वि. पंजाब

  • ६ : मुंबई वि. दिल्ली

  • २०० पेक्षा अधिक धावसंख्या

  • २९ : चेन्नई सुपरकिंग्स

  • २४ : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर

  • २४ : मुंबई इंडियन्स

  • २२ : पंजाब किंग्स

  • २१ : कोलकता नाईट रायडर्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT