Rovman Powell - Sunil Narine Sakal
IPL

Sunil Narine: '...त्याने सर्वांना ब्लॉक केलंय', नारायणच्या T20 वर्ल्डकप खेळण्याबाबत विंडिज कर्णधार काय म्हणाला?

Rovman Powell: जून 2024 मध्ये टी20 वर्ल्डकप खेळवला जाणार असून या स्पर्धेत सुनील नारायणच्या खेळण्याबाबत वेस्ट इंडिजचा कर्णधार पॉवेलने भाष्य केले आहे.

Pranali Kodre

T20 World Cup 2024: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत मंगळवारी (16 एप्रिल) 31 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला राजस्थान रॉयल्सने शेवटच्या चेंडूवर 2 विकेट्सने पराभूत केले. राजस्थानच्या या विजयात जॉस बटलरने शतक करत मोलाचा वाटा उचलला, याबरोबरच रोवमन पॉवेलनेही महत्त्वाचे योगदान दिले.

दरम्यान, या सामन्यानंतर पॉवेल पत्रकार परिषदेत उपस्थित होता. यावेळी त्याला सुनील नारायणबद्दल देखील प्रश्न विचारण्यात आला.

सुनील नारायणने या सामन्यात कोलकातासाठी शतक केले होते, तसेच त्याने 1 विकेटही घेतली होती. परंतु, त्याने गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने वेस्ट इंडिजकडून 2019 साली अखेरचा टी20 सामना खेळला आहे. त्याने गेल्या काही वर्षात जगभरातील विविध टी20 लीग स्पर्धांवर लक्ष केंद्रित केले आहे.

परंतु, जून 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी20 वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. या स्पर्धेसाठी नारायणने निवृत्तीतून माघार घ्यावी यासाठी प्रयत्न करत असल्याचे वेस्ट इंडिजचा टी20 कर्णधार पॉवेलने सांगितले आहे. पण याला अद्याप नारायणकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्याने सांगितले.

तो पत्रकार परिषदेत म्हणाला, 'गेल्या 12 महिन्यात मी याबाबत नारायणशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्याने सर्वांना ब्लॉक केले आहे.'

'मी कायरन पोलार्ड, ड्वेन ब्रावो आणि निकोलस पूरन यांनाही त्याच्याशी बोलण्यात सांगितले आहे. आशा आहे की टी20 वर्ल्डकपसाठी ते सर्वजण संघ निवडण्यापूर्वी नारायणचे मन वळवण्यात यशस्वी होतील.'

दरम्यान, मंगळवारी ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर सुनील नारायणने सलामीला फलंदाजी करताना 56 चेंडूत 109 धावांची खेळी केली, ज्यात 13 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता.

त्याच्या या शतकाच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकात 6 बाद 223 धावा केल्या होत्या. राजस्थानकडून गोलंदाजीत अवेश खान आणि कुलदीप सेन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर राजस्थान रॉयल्सने 224 धावांचे लक्ष्य डावाच्या शेवटच्या चेंडूवर पूर्ण केले. राजस्थानकडून जॉस बटलरने 60 चेंडूत 107 धावांची नाबाद खेळी केली. त्याचबरोबर रियान परागने 14 चेंडूत 34 धावांची खेळी केली, तर रोवमन पॉवेलने 13 चेंडूत 26 धावांची खेळी केली.

कोलकाताकडून गोलंदाजीत हर्षित राणा, सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. (Rovman Powell wants Sunil Narine to play in T20 World Cup)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update: पुण्यात पावसाचा हाहाकार! एकता नगरमध्ये पाणी शिरलं, खडकवासल्यातून विसर्ग वाढला

Kolhapur Rain Update : पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली, जिल्ह्यातील ४१ मार्गांवर पाणी; राधानगरी धरणाचे ५ दरवाजे बंद, असा आहे पावसाचा अंदाज?

Pune-Mumbai Train Cancelled : पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! सर्व रेल्वे गाड्या रद्द, पाहा संपूर्ण यादी

Post Office Scheme: रोज फक्त 50 रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल 35 लाखांचा फंड; काय आहे योजना?

Rain-Maharashtra Latest live news update: गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग, नाशिकमध्ये पूरस्थितीची शक्यता

SCROLL FOR NEXT