Virat Kohli and Gautam Gambhir 
IPL

IPL 2023: एलिमिनेटरमध्ये गौतम गंभीर अन् विराट कोहली पुन्हा आमनेसामने! जाणून घ्या कसे काय

एलिमिनेटरमध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना पाहता येईल का?

Kiran Mahanavar

IPL 2023 Eliminator : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सचा मोठ्या फरकाने पराभव करून प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. याशिवाय फाफ डू प्लेसिसच्या संघाने निव्वळ धावगती सुधारली आहे. त्याचवेळी सोशल मीडियावर चाहत्यांचे म्हणणे आहे की, एलिमिनेटरमध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना पाहायला मिळणार आहे.

खरंतर, क्रिकेट चाहत्यांना गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यातील सामना पाहायचा आहे, पण ते शक्य आहे का? चाहत्यांना एलिमिनेटरमध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना पाहता येईल का?

आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 12 सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी 6 सामने जिंकले आहेत, तर 6 सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे 12 सामन्यांत 12 गुण आहेत. हा संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे.

तर लखनौ सुपर जायंट्स 13 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. जर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांचे आगामी दोन्ही सामने जिंकण्यात यश मिळवले तर ते 16 गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतात.

त्याचबरोबर लखनऊ सुपर जायंट्स प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. जर लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहून प्लेऑफसाठी पात्र ठरले, तर चाहत्यांना दोन्ही संघांमधील एलिमिनेटर पाहता येईल.

मात्र, यासाठी इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे. रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. त्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सने एक ट्विट केले. या ट्विटनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी सतत प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर चाहत्यांचे म्हणणे आहे की, त्यांना लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील एलिमिनेटर सामना पाहायचा आहे. मात्र प्लेऑफमध्ये पोहोचणारे टॉप-4 संघ कोणते?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT