IPL 2023 RCB vs DC  esakal
IPL

RCB vs DC : पराभवाचा पंजा! दिल्ली कॅपिटल्स काही तळ सोडेना

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2023 RCB vs DC : ऋषभ पंत विना खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्ससाठी यंदाचा हंगाम खूप खराब जात आहे. दिल्लीने सलग चार सामन्यात पराभव सहन केल्यावर आरसीबीविरूद्ध तरी विजयी खाते उघडेल अशी आशा होती. मात्र दिल्ली कॅपिटल्सने आपला पराभवाचा पंजा पूर्ण केला.

दिल्लीला आरसीबीचे 175 धावांचे आव्हान पेलवले नाही. त्याचा डाव 20 षटकात 9 बाद 151 धावांवर संपला. आरसीबीने 23 धांवांनी सामना जिंकत हंगामातील आपला दुसरा विजय नोंदवला. गुणतालिकेत आरसीबीने 4 गुण घेत सातवे स्थान गाठले आहे. आरसीबीकडून फलंदाजीत विराट कोहलीने 50 धावा केल्या तर गोलंदाजीत विजयकुमार वशाखने 3 विकेट्स घेतल्या.

दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीला 174 धावात रोखले खरे मात्र त्यांना या धावांचा पाठलाग करताना चांगली सुरूवात करता आली नाही. त्यांचे 4 फलंदाज पॉवर प्लेमध्ये 30 धावात माघारी गेले. यानंतर मनिष पांडेने झुंजार अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर अक्षर पटेलने 21 आणि अमन खानने 18 धावा करत थोडा प्रतिकार केला. मात्र आरसीबीच्या विजयकुमार वशाखने 20 धावात 3 तर मोहम्मद सिराजने 2 बळी टिपले. यामुळे दिल्लीचा डाव धावात संपुष्टात आला.

रॉयल चॅलेंजर बेंगलोर आणि दिल्ली कॅपिट्लस यांच्यातील सामन्यात आज नाणेफेक जिंकून दिल्लीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चांगली सुरूवात करूनही दिल्लीच्या भेदक माऱ्यासमोर मधली फळी ढेपाळल्यामुळे आरसीबीला 20 षटकात 6 बाद 174 धावांपर्यंतच मजल मारता आली. आरसीबीकडून विराट कोहलीने सर्वाधिक 50 धावा केल्या. दिल्लीकडून मिचेल मार्श आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

(Sports Latest News)

हेही वाचा : What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT