RR vs DC IPL 2023 Desperate to break losing streak Delhi Capitals take on Rajasthan Royals cricket news in marathi kgm00 
IPL

IPL 2023 : दिल्लीची विजयाची प्रतीक्षा संपणार? राजस्थान रॉयल्सशी गुवाहाटीत आज लढत

पहिल्या दोन लढतींत दिल्ली कॅपिटल्सला़ पराभवाचा सामना करावा लागला आता तरी...

सकाळ ऑनलाईन टीम

Rajasthan Royals vs Delhi Capitals IPL 2023 : रिषभ पंतच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्सचा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये मैदानात उतरत आहे; मात्र पहिल्या दोन लढतींत दिल्ली कॅपिटल्सला लखनौ सुपर जायंटस्‌ व गुजरात टायटन्स या दोन संघांकडून पराभवाचा सामना करावा लागला. आता दिल्ली कॅपिटल्सचा संघ पराभवाची हॅट्‌ट्रिक टाळण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल. राजस्थान रॉयल्सला मात्र पंजाब किंग्सविरुद्धच्या पराभवानंतर पुन्हा विजयी ट्रॅकवर येण्यासाठी सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे.

दिल्लीच्या फलंदाजांना पहिल्या दोन्ही लढतींत चमक दाखवता आली नाही. या दोन्ही लढतींत कर्णधार डेव्हिड वॉर्नर बरा खेळला; पण पृथ्वी शॉ, सर्फराझ खान या दोन्ही मुंबईकरांना वेगवान गोलंदाजांसमोर समर्थपणे उभे राहता आले नाही.

दोघांचाही आज पुन्हा कस लागेल. मिचेल मार्श, रायली रोसो यांच्याकडूनही अपेक्षा भंग झालेला आहे. दिल्लीच्या संघात राखीव खेळाडूही अव्वल दर्जाचे नाहीत. सर्फराझ खानला बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतल्यास त्यांना यश धुल, रिपल पटेल व ललित यादव यांच्यापैकी एकाला संघात स्थान द्यावे लागणार आहे. राजस्थानच्या जॉस बटलरला दुखापतीमुळे उद्याच्या लढतीत खेळता येणार नाहीत. दिल्लीसाठी ही आनंदाची बातमी आहे.

दिल्लीचा गोलंदाजी विभागही कमकुवत वाटत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या ॲनरीक नॉर्कियाच्या समावेशामुळे दिल्लीचा आत्मविश्‍वास थोडातरी उंचावला असेल. त्याने गुजरातविरुद्धच्या लढतीत २ फलंदाजांना बाद केले; पण धावा रोखण्यात त्याला यश मिळाले नाही. खलील अहमद, मुकेश कुमार, मिचेल मार्श प्रभावी ठरीत नाही. कुलदीप यादवकडूनही अपेक्षा पूर्ण होत नाहीत.

यशस्वी, सॅमसनकडून अपेक्षा

दुखापतग्रस्त जॉस बटलरऐवजी जो रुट याला राजस्थानच्या संघात संधी देण्यात येऊ शकते; पण राजस्थानच्या फलंदाजीची मदार कर्णधार संजू सॅमसन व यशस्वी जयस्वाल यांच्या खांद्यावर असणार आहे. राजस्थानच्या गोलंदाजी विभागातही अनुभवाची कमतरता नाही. ट्रेंट बोल्ट, जेसन होल्डर, रविचंद्रन अश्‍विन, युझवेंद्र चहल हे चारही गोलंदाज अनुभवी आहेत, त्यामुळे दिल्लीसाठी उद्याचा पेपरही कठीण असेल, एवढे मात्र नक्की आहे.

आजची लढत

राजस्थान रॉयल्स - दिल्ली कॅपिटल्स

स्थळ - गुवाहाटी वेळ - दुपारी ३.३० वाजता

प्रक्षेपण - स्टार स्पोर्टस्

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: तमिळनाडूत एनआयएचे छापे, रामलिंगम हत्याप्रकरणातील संशयिताला अटक

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT