rr vs kkr ipl 2023 match who will win todays ipl match between kolkata knight riders vs rajasthan royals
rr vs kkr ipl 2023 match who will win todays ipl match between kolkata knight riders vs rajasthan royals sakal
IPL

RR vs KKR IPL 2023 : कोलकत्याला सलग तिसऱ्या विजयाची आशा

सकाळ वृत्तसेवा

कोलकता : गतवेळचा उपविजेता राजस्थान रॉयल्स आणि दोन वेळचा विजेता कोलकता नाईट रायडर्स यांच्यामध्ये उद्या आयपीएलची लढत रंगणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत झालेल्या लढतींपैकी पाच सामन्यांमध्ये विजय मिळवले असून सहा सामन्यांमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

याच पार्श्वभूमीवर प्ले- ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी उद्याची लढत अत्यंत महत्त्वाची असणार आहे. कोलकता नाईट रायडर्सचा संघ सलग तिसऱ्या विजयासाठी प्रयत्न करील. राजस्थान रॉयल्सचा संघ सलग तीन सामन्यांमध्ये झालेल्या पराभवांची मालिका खंडित करण्यासाठी सज्ज असेल.

कोलकताने मागील दोन लढतींत हैदराबाद व पंजाब या दोन संघांना अखेरच्या चेंडूवर पराभूत केले. कोलकत्यासाठी पंजाबविरुद्धच्या लढतीत एक महत्त्वाची बाब घडली. आंद्रे रस्सेलने ४२ धावांची खेळी साकारत कोलकताला विजयी केले. मोसमातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात रस्सेल फॉर्ममध्ये आला. रिंकू सिंगने २ अर्धशतकांसह ३३७ धावा फटकावल्या आहेत. आता रस्सेल व रिंकू या दोन खेळाडूंवर फिनीशरची जबाबदारी असणार आहे.

कर्णधार नितीश राणा (३२६ धावा), व्यंकटेश अय्यर (३१४ धावा), जेसन रॉय (२१८ धावा), रहमानुल्लाह गुरबाज (१९८ धावा) यांच्या खांद्यावर कोलकत्याच्या फलंदाजीची धुरा असणार आहे. सुनील नारायणकडून प्रभावी कामगिरी होत नसली तरी वरुण चक्रवर्ती याने ११ सामन्यांमधून १७ विकेट घेत कोलकत्याचे प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचे आव्हान कायम ठेवले आहे.

सुयश शर्मा, आंद्रे रस्सेल, हर्षित राणा या गोलंदाजांना राजस्थानच्या फलंदाजांना रोखावे लागणार आहे. शार्दुल ठाकूर याची जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे कोलकता संघाकडून त्याला प्रत्येक सामन्यात खेळवण्याची जोखीम पत्करली जात नाही. छोट्या दुखापतीलाही त्याला सामोरे जावे लागले आहे, पण आता साखळी फेरीच्या उर्वरित लढतीत तो खेळण्याची शक्यता आहे.

राजस्थान संघाची फलंदाजीची मदार यशस्वी जयस्वाल (४७७ धावा), जॉस बटलर (३९२ धावा) व संजू सॅमसन (३०८ धावा) या तीन फलंदाजांवर आहे. या तीन फलंदाजांनी आतापर्यंत राजस्थानसाठी मोलाची कामगिरी केली आहे; पण शिमरॉन हेटमायर (२१९ धावा), देवदत्त पडिक्कल (२०६ धावा), ध्रुव जुरेल (१४१ धावा) यांच्याही कामगिरीत सातत्य असायला हवे.

अश्‍विन, चहल जोडगोळी निर्णायक ठरणार

राजस्थानची जमेची बाजू म्हणजे फिरकी गोलंदाजांचा अनुभव. रवीचंद्रन अश्‍विन व युझवेंद्र चहल या दोन फिरकीपटूंच्या समावेशामुळे राजस्थानच्या गोलंदाजीला बळकटी आली आहे. युझवेंद्रने १७, तर अश्‍विनने १४ फलंदाज बाद करीत आपल्या प्रतिमेला साजेशी कामगिरी केली आहे.

ट्रेंट बोल्ट व संदीप शर्मा यांनीही समाधानकारक कामगिरी केली आहे, पण पहिल्या पाचपैकी चार सामन्यांमध्ये विजय साकारणाऱ्या राजस्थानला मागील सहा लढतींमधून फक्त एकाच लढतीत विजय संपादन करता आला आहे. यामुळे त्यांच्यावर प्ले-ऑफमधून बाहेर पडण्याची आपत्तीही ओढवू शकते. यामुळे राजस्थानसाठी यापुढील सर्व लढती महत्त्वाच्या ठरणार आहेत.

आजची लढत

कोलकता नाईट रायडर्स-राजस्थान रॉयल्स

स्थळ- कोलकता

वेळ- संध्याकाळी ७.३० वाजता

प्रक्षेपण- स्टार स्पोर्टस्

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 DC vs LSG Live Score: अर्धा संघ माघारी परतला, पण पुरनची एकाकी झुंज; अवघ्या 20 चेंडूत झळकावलं अर्धशतक

Ghatkopar hoarding : 'जीव वाचला पण रोजी रोटी गेली'; गंभीर जखमी झालेले टॅक्सी चालक सुभेदार मोर्या यांची व्यथा

Table Tennis: मनिका बत्राने रचला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी बनली पहिलीच भारतीय महिला टेबल-टेनिसपटू

PM Modi: ना घर, ना जमीन; पंतप्रधान मोदींची किती आहे संपत्ती? शपथपत्रातून आलं समोर

IND W vs SA W: भारत दौऱ्यावर येणार दक्षिण आफ्रिका संघ! BCCI ने केली शेड्युलची घोषणा, पाहा कधी आणि केव्हा होणार सामने

SCROLL FOR NEXT