IPL 2023 Points Table Latest Updates sakal
IPL

IPL 2023 : पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ, संजूचे रॉयल एक नंबर वरून थेट...

आयपीएल 2023 ची चमकदार ट्रॉफी जिंकण्यासाठी सर्व 10 संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे आता तरी...

Kiran Mahanavar

IPL 2023 Points Table Latest Updates​: आयपीएल 2023 च्या पॉइंट टेबलमध्ये मोठी चढउतार आहे. आयपीएल 2023 ची चमकदार ट्रॉफी जिंकण्यासाठी सर्व 10 संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. आयपीएल 2023 मध्ये बुधवारी राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला. या रोमांचक सामन्यात पंजाब किंग्जच्या संघाने राजस्थान रॉयल्सचा 5 धावांनी पराभव केला.

राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यानंतर आयपीएल 2023च्या पॉइंट टेबलमध्ये मोठी चढउतार पाहायला मिळाली. पंजाब किंग्जला जबरदस्त फायदा झाला आहे आणि ते आयपीएल 2023 च्या पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत.

आयपीएल 2023च्या हंगामातील पंजाब किंग्जचा हा सलग दुसरा विजय आहे. या विजयासह पंजाब किंग्जचा नेट रनरेट +0.311 झाला असून तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

हार्दिक पांड्याचा कर्णधार असलेला गुजरात टायटन्स संघ अव्वल स्थानावर आहे. गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्जचे सलग दोन विजयानंतर 4-4 गुण आहेत, पण नेट रनरेटच्या बाबतीत हार्दिक पांड्याचा संघ पंजाबपेक्षा पुढे आहे. गुजरात टायटन्सचा निव्वळ रनरेट +0.700 आहे.

या पॉइंट टेबलमध्‍ये कोणत्‍याही टीमला टॉप 4मध्‍ये स्थान मिळेल, केवळ त्‍यांनाच प्लेऑफमध्‍ये जाण्‍याची संधी मिळेल. अशा परिस्थितीत प्रत्येक धावसंख्या आणि धावगती अत्यंत महत्त्वाची ठरते.

तिसऱ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आहे. मुंबई इंडियन्सचा 8 गडी राखून पराभव केल्यानंतर, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला 2 गुण मिळाले आणि त्यांचा निव्वळ धावगती +1.981 आहे. आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दुसरा सामना KKR विरुद्ध आहे, जर RCB हा सामना जिंकण्यात यशस्वी ठरला तर ते अव्वल स्थानावर पोहोचेल. पंजाब किंग्जविरुद्धच्या पराभवानंतर राजस्थान रॉयल्सचा संघ पहिल्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर घसरला आहे.

चेन्नई सुपर किंग्जचा सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाड आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत दोन सामन्यांमध्ये 149 धावा केल्यानंतर ऑरेंज कॅपमध्ये आघाडीवर आहे.

लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मार्क वुड पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मार्क वुडने आतापर्यंत आयपीएल 2023 च्या दोन सामन्यांमध्ये 8 विकेट्स घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT