Virat Kohli Sakal
IPL

IPL 2024, Eliminator: विराट आहे तुफान फॉर्ममध्ये, पण तरीही RCB टेन्शनमध्ये! जाणून घ्या कसा राहिलाय प्लेऑफमधील रेकॉर्ड

Virat Kohli in IPL Playoffs: विराट कोहलीने आत्तापर्यंत आयपीएल प्लेऑफमध्ये 14 सामने खेळले असून त्याचा रेकॉर्ड कसा राहिलाय जाणून घ्या.

Pranali Kodre

IPL 2024, RR vs RCB Eliminator: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील प्लेऑफला सुरुवात झाली असून एलिमिनेटरचा सामना बुधवारी (22 मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात खेळवला जाणार आहे.

हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ क्वालिफायन टूसाठी पात्र ठरेल, तर पराभूत होणाऱ्या संघाचा प्रवास थांबेल. त्याचमुळे दोन्ही संघांना स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय आवश्यक आहे.

दरम्यान, बंगळुरूने सलग 6 सामने जिंकत प्लेऑफ गाठली आहे. त्यांच्या या यशात विराट कोहलीचेही मोठे योगदान राहिले आहे. त्याने यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा केल्या आहेत. पण असे असले तरी त्याची आत्तापर्यंतचा प्लेऑफमधील कामगिरी बंगळुरू चिंता वाढवणारी आहे.

खरंतर विराटची आयपीएलमधील कामगिरी नेहमीच चांगली झालेली आहे. तो आयपीएल इतिहासातीलही सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. मात्र, साखळी फेरीत त्याची कामगिरी खूप चांगली होत असली, तरी प्लेऑफमध्ये मात्र तो संघर्ष करताना दिसला आहे.

विराटने त्याच्या कारकि‍र्दीत प्लेऑफमध्ये 14 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अवघ्या 25.66 च्या सरासरीने 308 धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 70 धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी राहिली आहे.

त्यामुळे बंगळुरूला त्याच्या या आकडेवारीचे थोडं टेंशन असू शकतं, पण तरी विराट यंदा ज्या शानदार फॉर्ममध्ये आहे, ते पाहून त्यांना अपेक्षा असेल की तो यावेळी प्लेऑफमध्ये चांगली कामगिरी करेल.

विराटने आयपीएल 2024 स्पर्धेत आत्तापर्यंत 14 सामन्यांमध्ये 64.36 च्या सरासरीने आणि 155.60 च्या स्ट्राईक रेटने 1 शतक आणि 5 अर्धशतकांसह 708 धावा केल्या आहेत.

विराटने 2016 नंतर दुसऱ्यांदा आयपीएलमध्ये 700 हून अधिक धावा केल्या आहेत. तो दोन हंगामात 700 हून अधिक धावा करणारा ख्रिस गेलनंतरचा दुसराच खेळाडू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : गौतम अदानी अयोध्येत दाखल

SCROLL FOR NEXT