Ruturaj Gaikwad | IPL 2024 Sakal
IPL

Ruturaj Gaikwad: वानखेडेवर CSK च्या ऋतुराजचा पराक्रम, सचिन तेंडुलकरचा मोडला मोठा विक्रम

MI vs CSK, IPL 2024: रविवारी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात वानखेडे स्टेडियमवर खेळताना चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Pranali Kodre

Ruturaj Gaikwad IPL Record: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 29वा सामना रविवारी (14 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झाला.

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने अर्धशतकी खेळी करताना मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.

ऋतुराजने या सामन्यात 40 चेंडूत 69 धावांची खेळी केली. या खेळीत ऋतुराजने 5 चौकार आणि 5 षटकार ठोकले. या खेळीदरम्यान ऋतुराजने आयपीएल कारकिर्दीत २००० धावा पूर्ण केल्या. त्याने 58 आयपीएल सामने खेळताना 57 डावात 2021 धावा केल्या आहेत.

ऋतुराजने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम

त्यामुळे ऋतुराज आयपीएलमध्ये सर्वात कमी डावात 2000 धावा करणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे, तर एकूण तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. ऋतुराजने या विक्रमाच्या यादीत केएल राहुल आणि सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे.

केएल राहुलने 60 डावांमध्ये 2000 आयपीएल धावा केल्या होत्या, तर सचिन तेंडुलकरने 63 डावात 2000 धावांचा टप्पा गाठला होता.

आयपीएलमध्ये सर्वात कमी डावात 2000 धावा करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने 48 डावात हा पराक्रम केला आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शॉन मार्शने 52 डावात आयपीएलमध्ये 2000 धावा केल्या होत्या.

आयपीएलमध्ये सर्वात कमी डावात 2000 धावा करणारे क्रिकेटपटू

  • 48 डाव - ख्रिस गेल

  • 52 डाव - शॉन मार्श

  • 57 डाव- ऋतुराज गायकवाड

  • 60 डाव - केएल राहुल

  • 63 डाव - सचिन तेंडुलकर

चेन्नईचा प्रमुख खेळाडू

ऋतुराजने 2020 मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून तो चेन्नई संघाचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. त्याने चेन्नईकडून 2021 हंगामात 635 धावा करत ऑरेंज कॅपही जिंकली होती. तसेच त्याने गेल्यावर्षीही 550 धावांचा टप्पा पार केला होता.

इतकेच नाही आयपीएल 2024 पूर्वी चेन्नई सुपर किंग्स संघाच्या नेतृत्वाची जबाबदारीही त्याच्याकडे देण्यात आली आहे. या हंगामापूर्वी एमएस धोनीने नेतृत्वपदाचा राजीनामा दिला आणि ही जबाबदारी ऋतुराजच्या हाती सोपवली आहे. त्यामुळे ऋतुराज आयपीएल 2024 मध्ये चेन्नईचे नेतृत्व करतानाही दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway : शक्तिपीठ महामार्गामुळे किंग कोब्रा, पट्टेरी वाघ, गवे, हत्ती, बिबट्यांना धोका, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तीव्र विरोध, कसा असेल मार्ग

Breaking News Live Update: राहुरीत अपक्ष उमेदवाराचा सायकलवर प्रचार; सुजय विखेंचीही घेतली भेट

Pune Politics News: शरद पवारांचा लवकरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा दौरा; नव्याने पक्ष संघटना उभारणीसाठी देवदत्त निकम यांच्यासोबत चर्चा

Asha Bhosle Video : 'या' शाळेत झालं आहे आशा भोसले यांचं शिक्षण, स्वतः व्हिडिओ शेअर करत सांगितल्या होत्या कोल्हापूरच्या गोड आठवणी

Gold Silver Price Impact War : सोने चांदी दरावर अद्याप युद्धाचा परिणाम, आठवड्यातील दराची आकडेवारी आली समोर

SCROLL FOR NEXT