Arjun Tendulkar Sakal
IPL

Arjun Tendulkar: सचिनचा मुलगा नरसोबा वाडीत काय करतोय ? अर्जुन पोहचला दत्ताच्या चरणी

Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकर कोल्हापूरच्या नरसोबा वाडीतील दत्त महाराजांच्या चरणी नतमस्तक झाला.

Pranali Kodre

Arjun Tendulkar: इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL) स्पर्धेतील मुंबई इंडियन्सची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. त्यांना प्लेऑफमध्येही प्रवेश करण्यात अपयश आले. दरम्यान, मुंबईचे या स्पर्धेतील आव्हान संपल्यानंतर आता खेळाडू आपापल्या घरी परतले आहेत.

यादरम्यान, सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू अर्जुन तेंडुलकर कोल्हापूरला पोहचला आहे. त्याने यावेळी कोल्हापूरच्या नरसोबा वाडीतील दत्त महाराज मंदिरालाही भेट देत दर्शन घेतले.

तो दत्त महाराजांच्या चरणी नतमस्तक झाल्याचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की अर्जुन श्रद्धेने मंदिरात पाया पडत आहे. तसेच मंदिराच्या आवारात त्याला पाहण्यासाठी लोकंही जमा झालेली आहेत.

अनेक रिपोर्ट्सनुसार नरसोबा वाडीतील दत्त महाराजांवर तेंडुलकर कुटुंबियांची श्रद्धा आहे. याआधीही सचिन आणि अर्जुन यांनी या मंदिरात येऊन दर्शन घेतले होते.

आयपीएल 2024 मध्ये एकाच सामन्यात संधी

अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 साठी संघात कायम केले होते. पण त्याला पहिल्या 13 सामन्यांत प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र त्याला 14 व्या आणि शेवटच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. मात्र क्रॅम्प्स आल्याने तो केवळ 2.2 षटकेच गोलंदाजी करू शकला.

दरम्यान, अर्जुनने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून आत्तापर्यंत 5 सामन खेळले आहेत. यामध्ये त्याने 3 विकेट्स घेतल्या आहेत.

गोव्याकडून खेळतो अर्जुन

अर्जुन देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या गोवा संघाकडून खेळतो. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून पदार्पण केले होते. मात्र, मुंबई संघात जागा मिळत नसल्याने गेल्या गेल्या दोन वर्षापासून गोव्याकडून खेळत आहे. तो गोव्याकडून नियमित खेळताना दिसतो.

त्याने त्याच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत 13 प्रथम श्रेणी सामने खेळले असून 21 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 481 धावा केल्या आहेत. त्याने 15 लिस्ट ए सामने खेळले असून त्यातही 21 विकेट्स घेतल्यात, तर टी20 क्रिकेटमध्ये 21 सामने खेळले असून 26 विकेट्स घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT