Sanju Samson esakal
IPL

Sanju Samson RR vs LSG : संजू भाऊचा शॉट एकदम कडक! बॅटफूटवरून ठोकला मिडऑफला षटकार, VIDEO व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

Sanju Samson RR vs LSG IPL 2024 : आयपीएल 2024 च्या पहिल्या सुपर संडे सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स लढत होत आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानने 4 बाद 193 धावा केल्या. यात कर्णधार संजू सॅमसनच्या नाबाद 82 धावांचे मोठे योगदान होते. त्याने तिसऱ्या विकेटसाठी रियान परागसोबत 93 धावांची भागीदारी रचली.

संजू सॅमसनने सलग पाचव्या हंगामात पहिल्याच सामन्यात अर्धशतकी खेळी करण्याचा कारनामा केला. आज त्याने 52 चेंडूत 82 धावांची नाबाद खेळी केली. त्याने या खेळीत 6 षटकार आणि तीन चौकार मारले. या सहा षटकारपैकी मोहसीन खानला मारलेला एक षटकार खूप जबरदस्त होता.

डावखुऱ्या मोहसीन खानने ऑफ साईडला शॉर्ट बॉल टाकला होता. या शॉर्ट बॉलसाठी संजू आधीच तयार होता. त्याने क्रिजमध्ये डीप जात बॅकफूटवरून मिडऑफला चेंडू टोलावला अन् षटकार मारला.

सामन्याबद्दल बोलाचं झालं तर संजू सॅमसनच्या नाबाद 82 आणि रियान परागच्या 43 धावांच्या जोरावर राजस्थानने 20 षटकात 4 बाद 193 धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात लखनौ सुपर जायंट्सला 20 षटकात 6 बाद 173 धावाच करता आल्या. लखनौकडून कर्णधार केएल राहुल (58 धावा) आणि निकोलस पूरनने (नाबाद 64 धावा) झुंजार अर्धशतके ठोकली. मात्र राजस्थानच्या गोलंदाजांनी सांघिक कामगिरी करत इतर फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठू दिला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT