Sanju Samson Celebration | LSG vs RR | DC vs MI X/IPL
IPL

LSG vs RR: कॅप्टन सॅमसनची विजयी षटकारासह विजयी गर्जना! राजस्थानला जिंकवल्यानंतर केलं जोरदार सेलिब्रेशन, Video एकदा पाहाच

Sanju Samson Celebration: संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्सला आठवा विजय मिळवून दिल्यानंतर गर्जना करत जोरदार सेलिब्रेशन केले.

Pranali Kodre

Sanju Samson Celebration: राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमयर लीग 2024 स्पर्धेत (IPL) शानदार कामगिरी केली आहे. त्यांनी शनिवारी (27 एप्रिल) लखनौ सुपर जायंट्स संघालाही त्यांच्याच घरच्या मैदानात एकाना क्रिकेट स्टेडियमवर 7 विकेट्सने पराभूत करत यंदाच्या हंगामातील 8 व्या विजयाची नोंद केली आहे.

दरम्यान, या विजयानंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने केलेलं सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरला.

खरंतर संजू सॅमसन हा शांत स्वभावाचा खेळाडू समजला जातो, तो फार आक्रमकतेने सेलिब्रेशन करताना क्वचितच दिसला आहे. मात्र लखनौविरुद्ध विजय मिळवल्यानंतर त्याने जोरदार सेलिब्रेशन केले. याचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे. त्याने विजयी षटकार ठोकल्यानंतर गर्जना करत सेलिब्रेशन केले.

संजू सॅमसन या विजयाचा हिरोही ठरला. या सामन्यात लखनौने दिलेल्या 197 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संजू सॅमसनने 33 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांसह 71 धावांची नाबाद खेळी केली. ही खेळी करताना त्याने ध्रुव जुरेलसह चौथ्या विकेटसाठी 62 चेंडूत नाबाद 121 धावांची भागीदारी केली.

जुरेलने 34 चेंडूत 52 धावांची खेळी केली. सॅमसन आणि जुरेलने केलेल्या खेळीमुळे राजस्थानने 19 षटकातच 3 विकेट्स गमावत 199 धावा करत सामना जिंकला.

दरम्यान 19 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सॅमसनने खणखणीत विजयी षटकार मारला होता. या सामन्यानंतर सॅमसनला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

दरम्यान, या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्स संघ प्रथम फलंदाजीला उतरला.

लखनौकडून कर्णधार केएल राहुलने 48 चेंडूत 76 धावांची खेळी केली. तसेच दीपक हुड्डाने 31 चेंडूत 50 धावांची खेळी केली. त्यामुळे लखनौने 20 षटकात 5 बाद 196 धावा उभारल्या होत्या.

राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने वाटचाल

राजस्थान रॉयल्सने सध्या आयपीएलच्या 17 व्या हंगामात खेळलेल्या 9 सामन्यांमध्ये केवळ एकच पराभव स्विकारला आहे. त्यामुळे ते 8 विजयांसह 16 गुण मिळवत पाँइंट्स - टेबलमध्ये अव्वल क्रमांकावर आहेत.

अद्याप त्यांना 5 सामने खेळायचे आहेत. यातील एक किंवा दोन सामन्यांतील विजय त्यांना प्लेऑफचे तिकिट पक्के करून देऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Opening: शेअर बाजार वाढीसह उघडला; निफ्टी 80 अंकांनी वधारला, कोणत्या शेअर्समध्ये तेजी?

IND vs AUS : रोहित शर्मा, विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर निवृत्ती घेणार? BCCI ने स्पष्ट केली भूमिका; ही त्यांची शेवटची मालिका...

Zilla Parishad Politics : जिल्हा परिषदेसाठी कायपण! ‘सरकार’, ९६ कुळी, म्हणून घेणारे होणार ‘कुणबी’; स्वतःसह सौभाग्यवतींचेही काढले दाखले

Missing Lawyer Case : तीन महिन्यांपासून वकील बेपत्ता, शिंदे गटाच्या 'या' आमदारावर गंभीर आरोप; किशोरी आरडे म्हणाल्या, 'माझ्या पतीच्या जीवाला..'

Latest Marathi News Live Update : झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणासंदर्भात एसआयटी/सीआयडीने अटक केलेल्या श्यामकानु महंता, सिद्धार्थ शर्मा आणि इतरांना आज न्यायालयात हजर करणार

SCROLL FOR NEXT