Sanju Samson Fined DC vs RR IPL 2024  sakal
IPL

Sanju Samson Fined: अंपायरशी वाद घालणे आले अंगलट... BCCI ची संजू सॅमसनवर मोठी कारवाई; काय आहे संपूर्ण प्रकरण

Sanju Samson Fined DC vs RR IPL 2024: आयपीएल 2024 मध्ये बीसीसीआयने राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनवर मोठी कारवाई केली आहे.

Kiran Mahanavar

Sanju Samson Fined DC vs RR IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये बीसीसीआयने राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनवर मोठी कारवाई केली आहे. राजस्थान संघ 7 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळला. या सामन्यात संजू सॅमसन त्याच्या विकेटनंतर पंचांशी वाद घालताना दिसला. संजू सॅमसनच्या या वर्तनावर बीसीसीआयने कारवाई केली आहे.

संजू सॅमसनवर बीसीसीआयची मोठी कारवाई

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसन 46 चेंडूत 86 धावा करून बाद झाला. यादरम्यान त्याने 8 चौकार आणि 6 षटकार मारले. पण 16व्या षटकात मुकेश कुमारच्या चेंडूवर तो झेलबाद झाला.

बाऊंड्री लाईनवर उभ्या असलेल्या शाई होपने त्याचा कॅच घेतला. तिसऱ्या पंचाने त्याला बाद घोषित केले. पण आऊट झाल्यानंतर तो पंचांशी वाद घालताना दिसला. अशा परिस्थितीत आता बीसीसीआयने पंचांच्या निर्णयाशी असहमती दाखवल्याबद्दल संजू सॅमसनवर मॅच फीच्या 30 टक्के दंड ठोठावला आहे.

बीसीसीआयने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून संजू सॅमसनला दंड ठोठावला आहे. प्रेस रिलीझ BCCI ने म्हटले आहे की, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामन्यादरम्यान आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या 30 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

सॅमसनने आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.8 अंतर्गत लेव्हल 1 चा गुन्हा केला आहे. त्याने गुन्हा कबूल केला आणि मॅच रेफरीची परवानगी स्वीकारली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja: कोट्यवधींचा तराफा फेल ठरला; ग्रहणकाळात लालबागच्या राजाचे विसर्जन होणार? भक्तांमध्ये संतापाची लाट

Asia Cup 2025: संजू सॅमसन नाही, तर हे दोन फलंदाज करणार भारतासाठी ओपनिंग; कुलदीप की दुबे, कोणाला प्लेइंग-११ मध्ये संधी?

जान्हवी कपूरच्या भाषाशैलीवर सोनम बाजवाची थट्टा

Pune Ganapati Visarjan: मानाच्या गणपतींनी वेळ पाळली, पण... ; ३१ तासांच्या विसर्जन मिरवणुकीवर पोलीस आयुक्त काय म्हणाले?

Ganesh Festival 2025 : पोलिसांच्या आवाहनाला न जुमानता मुरुडमध्ये डीजेच्या तालावर विसर्जन

SCROLL FOR NEXT