Sanju Samson IPL 2023
Sanju Samson IPL 2023  sakal
IPL

IPL 2023 : '...माझ्याकडे उत्तर नाही', संजू सॅमसन RCBविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर भडकला

Kiran Mahanavar

Sanju Samson IPL 2023 : आयपीएल 2023 मधील प्लेऑफसाठी सर्वात मोठा दावेदार मानल्या जाणाऱ्या संघांपैकी एक असलेल्या राजस्थान रॉयल्सला रविवारी आरसीबीविरुद्ध मोठा धक्का बसला. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील संघाला 112 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. याहूनही लाजिरवाणी गोष्ट म्हणजे एकापेक्षा जास्त बलवान फलंदाज असलेला हा राजस्थान संघ अवघ्या 59 धावांवर बाद झाला.

आयपीएलमधील राजस्थानची ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे. त्याचवेळी आयपीएलच्या इतिहासातील ही तिसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. या पराभवानंतर संघाचा कर्णधार सॅमसन नाराज दिसला.

विजयासाठी 172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ आयपीएलच्या इतिहासातील तिसऱ्या सर्वात कमी धावसंख्येवर आऊट झाला. संघाला केवळ 10.3 षटकेच फलंदाजी करता आली आणि 112 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. वेन पारनेल (10 धावांत 3 विकेट), मायकेल ब्रेसवेल (16 धावांत 2 विकेट) आणि कर्ण शर्मा (19 धावांत 2 विकेट) यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीसमोर शिमरॉन हेटमायर (19 चेंडूंत 35 धावा) शिवाय एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. पॉवर प्लेमध्ये राजस्थानचा निम्मा संघ 28 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आणि त्यानंतर त्यांना सावरता आले नाही.

या संघाने सुरुवातीच्या टप्प्यात चांगली कामगिरी केली परंतु लीगच्या उत्तरार्धात कुठेतरी रुळावरून खाली घसरला. सततच्या खराब कामगिरीबद्दल विचारले असता सॅमसन म्हणाला की, खरं तर हा एक मोठा प्रश्न आहे. मी विचार करत होतो आणि कुठे चुकले. माफ करा माझ्याकडे याचे उत्तर नाही.

यानंतर सलामीवीर जोस बटलर आणि यशस्वी जैस्वालसह राजस्थानचे चार फलंदाज खाते न उघडताच बाद झाले, तर संजू सॅमसन केवळ चार धावा करू शकला. सॅमसन म्हणाला की, आयपीएल ही एक अशी स्पर्धा आहे जिथे काही दिवसांतच उलटसुलट घडामोडी घडू शकतात.

या पराभवानंतर राजस्थान रॉयल्सच्या प्लेऑफच्या आशा फार कमी झाल्या आहेत पण कदाचित कर्णधार सॅमसनला अजूनही काही आशा आहेत. ते पुढे म्हणाले की, आयपीएलबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे. लीग टप्प्यांच्या शेवटी मजेदार गोष्टी घडतात. आपण मजबूत असले पाहिजे आणि त्या खेळाचा विचार केला पाहिजे.

आरसीबीविरुद्धच्या या मोठ्या पराभवामुळे राजस्थानचा नेट रन रेट ढासळला आहे. संघ 13 सामन्यांतून 12 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket Team : जिंकलेत आयर्लंडविरूद्ध अन् म्हणे पाकिस्तान जगातील सर्वोत्तम संघ... PCB च्या नक्वींनी कळसच गाठला

Pune Traffic : मेट्रोच्या कामामुळे सिमला ऑफिस चौकाजवळ वाहतुकीत बदल

PM Modi Mumbai roadshow : ''जुने रेकॉर्ड तोडणार'' मोदींच्या मुंबईतील 'रोड शो'ला तुफान प्रतिसाद; पंतप्रधान म्हणाले...

IPL 2024 RR vs PBKS Live Score: आवेशने एकाच ओव्हरमध्ये पंजाबला दिले दुहेरी धक्के! धोकादायक रुसो पाठोपाठ शशांक सिंगही परतला माघारी

Pune Crime News : महादेव ॲपद्वारे ऑनलाइन सट्टा चालविणाऱ्या कॉल सेंटरवर छापा

SCROLL FOR NEXT