Shah Rukh Khan Personal Wish Is To See Rinku Singh In India's T20 Squad News sakal
IPL

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Team India Squad For T20 World Cup 2024 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाची घोषणा करण्याची तयारीही जवळपास पूर्ण केली आहे.

Kiran Mahanavar

T20 World Cup 2024 Team India Squad : आयपीएल 2024 मध्ये चाहत्यांना लवकरच टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी टीम इंडियाचा संघ पाहायला मिळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाची घोषणा करण्याची तयारीही जवळपास पूर्ण केली आहे.

याआधी कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खानने टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियामध्ये आपल्या संघातील एका खेळाडूचा समावेश करण्याची मागणी केली आहे. शाहरुखने केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि हर्षित राणा ज्यांनी या मोसमात चमकदार गोलंदाजी केली आहे, त्यांची शिफारस केली नाही तर दुसऱ्या खेळाडूची शिफारस केली आहे.

शाहरुखने या खेळाडूची केली शिफारस

29 एप्रिल रोजी आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि केकेआर यांच्यात सामना झाला. हा सामना पाहण्यासाठी बॉलिवूड अभिनेता आणि केकेआरचा मालक शाहरुख खान दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पोहोचला होता. शाहरुख खान केकेआरचा स्फोटक फलंदाज रिंकू सिंगच्या फलंदाजीचा चाहता आहे.

आता किंग खानने या खेळाडूला वर्ल्ड कपमध्ये खेळवण्याची शिफारस केली आहे. शाहरुखने स्टार स्पोर्ट्सवर सांगितले की, देशासाठी अनेक महान खेळाडू खेळत आहेत. मला रिंकू सिंग तसेच इतर अनेक युवा खेळाडू जे चमकदार कामगिरी करत आहेत त्यांना वर्ल्ड कपमध्ये खेळवायचे आहे. ज्याची मी वाट पाहत आहे. रिंकू वर्ल्डकप खेळला तर मी समाधानी होईन.

आयपीएल 2024 मधील 47 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि केकेआर यांच्यात खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकात 9 गडी गमावून 153 धावा केल्या. केकेआरकडून गोलंदाजी करताना वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.

154 धावांचे लक्ष्य केकेआरने 16.3 षटकांत 3 गडी गमावून पूर्ण केले. केकेआरकडून फलंदाजी करताना फिल सॉल्टने सर्वाधिक 67 धावांची खेळी केली. केकेआरचा या मोसमातील हा सहावा विजय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT