shikhar dhawan said bowler gave useless runs in this match lsg vs pbks ipl 2023 cricket news in marathi  
IPL

IPL 2023: 'रणनीती ठरली चुकीची...' संघाच्या पराभवानंतर कर्णधार धवन संतापला! कोणावर फोडले पराभवाचे खापर

"माझी रणनीती चुकीची ठरली तर केएल राहुलने..." पराभवानंतर धवन काय म्हणाला

Kiran Mahanavar

Shikhar Dhawan IPL 2023 : आयपीएल 2023 चा 38 वा लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळल्या गेला. या सामन्यात पंजाब संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर 56 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मोहालीच्या आयएस बिद्रा क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात लखनौ सुपरजायंट्सने प्रथम फलंदाजी करताना 5 विकेट गमावत 257 धावा केल्या.

प्रत्युत्तरात पंजाबचा संघ 19.5 षटकांत 201 धावांवर गारद झाला. या मोठ्या पराभवानंतर पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने सामना गमावण्याचे कारण स्पष्ट केले आणि आपल्या संघाच्या खेळावर मोठे विधान केले.

या सामन्यात कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र या सामन्यात त्यांचे गोलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. या पराभवानंतर शिखर धवनने आपली चूक मान्य करत मोठे वक्तव्य केले आणि म्हटले की, आम्ही अनेक अनावश्यक धावा दिल्या आणि त्याचा फटका आम्हाला सहन करावा लागला. मला वाटते की अतिरिक्त वेगवान गोलंदाज घेऊन जाण्याची रणनीती चुकीची ठरली तर केएल राहुलने अतिरिक्त फिरकी गोलंदाज आणला. मी काहीतरी बदलण्याचा प्रयत्न केला जो आज चालला नाही पण हरकत नाही. हा माझ्यासाठी चांगला धडा आहे आणि आता मी जोरदार पुनरागमन करेन.

पंजाब किंग्जचा संघ हा सामना हरला असला तरी त्यांच्या संघाचा कर्णधार शिखर धवन दुखापतीच्या विश्रांतीनंतर या सामन्यात परतला आहे. या सामन्यात धवनला एकच धाव करता आली असली तरी त्याच्या पुनरागमनामुळे संघाला लीगमध्ये अधिक बळ मिळेल.

धवन यंदा चांगल्या फॉर्ममध्ये होता पण दुखापतीमुळे त्याला विश्रांती घ्यावी लागली. धवन आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे. धवनने या मोसमात आतापर्यंत 5 सामन्यात 78.00 च्या सरासरीने आणि 145.34 च्या स्ट्राईक रेटने 234 धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Iyer बरा होतोय...! ICU मधून बाहेर, वाचा काय आहेत नवे अपडेट्स

Aditya Thackeray: वोटचोरी अन् बोगस मतदान...; निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरेंचा 'राहुल गांधी पॅटर्न'! मतदार यादीवरून मोठे खुलासे

Uddhav Thackeray Statement : ''मुंबईत अ‍ॅनाकोंडा येऊन गेला अन् भूमिपूजन करून गेला, त्याला मुंबई गिळायची'' ; उद्धव ठाकरेंचं विधान!

Sonika Yadav Video: सात महिन्यांची गर्भवती जिद्दीने उभी राहिली! वेटलिफ्टिंग स्पर्धेत १४५ किलो भार उचलून जिंकले पदक

Swargate News : एसटीला ‘लाडकी बहिणच’ नकोशी! बससेवेत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांवर भेदभाव

SCROLL FOR NEXT