Shubman Gill fights with umpires News Marathi
Shubman Gill fights with umpires News Marathi  SAKAL
IPL

LSG vs GT : चालू सामन्यात DRS वरून राडा, कर्णधार गिल अन् गुजरातचे खेळाडू अंपायरशी भिडले

Kiran Mahanavar

IPL 2024 LSG vs GT : आयपीएल 2024 मधील 21 वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात एकना स्टेडियमवर खेळला गेला. आणि या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाने बाजी मारली. या हंगामात केएल राहुलच्या नेतृत्वाखालील एलएसजी संघाचा हा तिसरा विजय आहे. पण सामन्याच्या पहिल्याच षटकात डीआरएस राडा पाहिला मिळाला. यादरम्यान गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल आणि इतर काही खेळाडू अंपायरशी भिडले.

या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डावाच्या पहिल्याच षटकात लखनौच्या क्विंटन डी कॉकच्या रूपाने पहिला मोठा धक्का बसला. त्यानंतर देवदत्त पडिक्कल क्रिजवर फलंदाजीसाठी आला. गुजरातसाठी उमेश यादव पहिले षटक टाकत होता. या ओव्हरचा शेवटचा चेंडू पडिक्कलच्या पॅडला लागला.

त्यावर उमेश यादवने जोरदार अपील केले होते, पण अंपायरने त्याला आउट दिले नाही. यानंतर उमेश यादवने शुभमन गिलला डीआरएस घेण्यास सांगितले. त्यानंतर तिसऱ्या अंपायरने पण त्याला नॉट आऊट दिले. ज्यावरून कर्णधार शुभमन गिल आणि इतर खेळाडू चांगलेच तापले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत गुजरात टायटन्सने 5 सामने खेळले आहेत, ज्यापैकी संघाने 2 जिंकले आहेत आणि 3 गमावले आहेत. तर लखनौ सुपर जायंट्सने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. त्यापैकी केएल राहुलच्या संघाने 3 जिंकले असून एकात पराभव झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT