Shubman Gill Century  
IPL

Shubman Gill Century : शुभमन गिलने IPL मध्ये शतक झळकावून रचला इतिहास! गुजरातसाठी केला हा मोठा पराक्रम

शुभमन गिलने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.

Kiran Mahanavar

Shubman Gill Century : आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होत आहे. या सामन्यात गुजरातचा संघ प्रथम फलंदाजीला आला. गुजरातचा युवा सलामीवीर शुभमन गिलने या सामन्यात उत्कृष्ट शतक ठोकले. आयपीएलच्या या मोसमात शतक ठोकणारा शुभमन हा सहावा फलंदाज ठरला आहे.

शुभमन गिलने आयपीएलमध्ये शतक झळकावताच मोठा पराक्रम केला आहे. IPL मध्ये शतक झळकावणारा गिल हा गुजरातचा पहिला फलंदाज ठरला आहे. आयपीएल 2022 चे विजेतेपद पटकावणाऱ्या गुजरातसाठी एकाही फलंदाजाला शतक झळकावता आले नाही.

इतकेच नाही तर गिलने आयपीएलमध्ये गुजरातसाठी सर्वात मोठी धावसंख्याही मागे टाकली आहे. या शतकापूर्वी हा विक्रम गिलच्या नावावरही होता, ज्याने 2022 मध्ये पंजाबविरुद्ध 96 धावा केल्या होत्या.

गुजरातसाठी सर्वात मोठी धावसंख्या करणारे फलंदाज

  • 101- शुभमन गिल विरुद्ध सनरायझर्स, गुजराज, 2023

  • 96 - शुभमन गिल वि पीबीकेएस, मुंबई, 2022

  • 94* - डेव्हिड मिलर विरुद्ध CSK, पुणे, 2022

  • 94* - शुभमन गिल वि LSG, अहमदाबाद, 2023

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाने 8 गडी गमावून 188 धावा केल्या. या सामन्यात गिलच्या शतकाशिवाय गुजरातकडून साई सुदर्शनने 36 चेंडूत 47 धावा केल्या. त्याशिवाय गुजरात संघाच्या एकाही फलंदाजाला विशेष काही करता आले नाही. हार्दिक पंड्या (8), डेव्हिड मिलर (7), राहुल तेवतिया (3) यांना विशेष काही करता आले नाही. दुसरीकडे सनरायझर्सकडून भुवनेश्वर कुमारने 5 विकेट घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT