shubman gill 
IPL

Shubman Gill : 'आता लग्नाची सुपारी फुटणार...' साराच्या अफवांमध्ये सचिन-शुबमनचा फोटो व्हायरल

सचिन तेंडुलकर-शुबमन गिलचा फोटो झाला व्हायरल अन्...

Kiran Mahanavar

Shubman Gill and Sachin Tendulkar Viral Picture : आयपीएलमध्ये शुभमन गिलच्या शतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये स्थान मिळाले. आता त्याच्याच शतकाने रोहित शर्माच्या संघालाही बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर शुभमन गिलने 49 चेंडूत शतक ठोकले. त्याने 129 धावांची खेळी खेळली. गिलने या खेळीत 7 चौकार आणि 10 षटकार मारले. त्याच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर गुजरात टायटन्सचा संघ सलग दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.

खेळासोबतच गिलचे वैयक्तिक आयुष्यही सध्या चर्चेत आले आहे. अलीकडेच त्याचे बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानसोबत ब्रेकअप झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. दरम्यान शुभमन गिल आणि सचिन तेंडुलकरचा फोटो व्हायरल होत असल्याने चाहते काही वेगळेच निष्कर्ष काढत आहेत.

आजकाल सारा अली खान आणि शुभमन गिलचे ब्रेकअप झाल्याची अफवा होती कारण दोघेही इंस्टाग्रामवर एकमेकांना फॉलो करत नाहीत. त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या येत असतानाच चाहत्यांना पुन्हा एकदा शुभमन गिलचे नाव सारा तेंडुलकरसोबत जोडण्याची संधी मिळाली.

आयपीएल 2023 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने आहेत. सामन्यादरम्यान गिल सचिन तेंडुलकरच्या जवळ गेला आणि दोघे गंभीरपणे संभाषण करताना दिसले. गिल गुजरात टायटन्सकडून खेळतो तर सचिन तेंडुलकर मुंबईचा मार्गदर्शक आहे आणि या दोघांचा हा फोटो व्हायरल झाला.

हा फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी पुन्हा एकदा सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांची नावे जोडण्यास सुरुवात केली. एका यूजरने लिहिले की, 'शुबमन अन् साराच्या लग्नाची सुपारी फुटणार.' दुसऱ्या यूजरने म्हटले की, दोघेही हुंड्याबद्दल बोलत असावेत. काहींनी सांगितले की सचिन शुभमन गिलला त्याच्या मुलीपासून दूर राहण्यास सांगत असावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीए परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT